‘माझ्यासोबत दुबईला चला, तिथं पार्टी करू, लपून कुठे जाता, हे आम्हाला माहितीये…; कंबोज यांचा राऊतांना इशारा
Mohit Kamboj : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या एका फोटोची राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊ येथे जाऊन कॅसिनोमध्ये जुगार खेळल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. बावनकुळे यांचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे. राऊत यांच्या या दाव्यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान, आता भाजपचे प्रवक्ते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही लपून छपून कुठे जाता, हे सगळं आम्हाला माहित आहे, असा इशारा कंबोज यांनी दिला.
Women’s Hygiene : इंटीमेट पार्टच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी; पाहा व्हिडिओ
मोहित कंबोज यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडित ते म्हणतात की, मी दोन दिवसांसाठी दुबईला जाणार आहे. तुम्हाला इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची सवय आहे. कोण कुठे येतो, कुठे जातो, कॅसिनोमध्ये कोण खेळतो, डिस्कोमध्ये कोण जातो या सगळ्याची माहिती तुम्हाला हवी असते. तुम्हाला देखील पार्टीची आवड आहे. तुम्ही लपून छपून कुठे जाता, हे सगळं आम्हाला माहित आहे, असा इशारा कंबोज यांनी दिला.
महाकाय ऑगर मशीननेही हात टेकले! अडकलेल्या 41 मजुरांना ख्रिसमसपर्यंत बाहेर काढू, तज्ञाचा दावा
ते म्हणाले, राऊत साहेब त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत दुबईला या, तिथे आपण मिळून पार्टी करू. तुम्ही येत नसाल तर तुमच्या डिटेक्टिव एजन्सीला सांगा, म्हणजे तुम्हाला हवे असलेले फोटो मिळतील, असा खोचक टोला कंबोज यांनी लगावला.
संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचंही कंबोज यांनी यावेळी म्हटलं. यावर बोलताना मोहित कंबोज म्हणाले की, तुमच्या डोक्यावर उपचार करा. होय, पण तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, कारण तुमच्यावर ईडीचे आरोप आहेत. तुम्हाला लुकआउट नोटीस दिली गेलीये. त्यामुळे तुम्हाला बाहेर फिरता येणार नाही, असा टोला लगावला.
याआधीही कंबोज यांनी राऊतांवर हल्लाबोल केला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुगारात साडेतीन कोटी रुपये गमावल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत हे भलते-सलते आकडे संजय राऊत आणतात तरी कुठून? राऊत यांच्याकडे याचे काही पुरावे आहेत का? त्यांनी आधी माझ्यावरही असेच आरोप केले आणि नंतर मी बोललो की, लगेच पळून गेले, असं कंबोज म्हणाले.
दरम्यान, कंबोज यांनी केलेल्या टीकेला आता संजय राऊत नेमकी काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.