महाकाय ऑगर मशीननेही हात टेकले! अडकलेल्या 41 मजुरांना ख्रिसमसपर्यंत बाहेर काढू, तज्ज्ञाचा दावा

महाकाय ऑगर मशीननेही हात टेकले! अडकलेल्या 41 मजुरांना ख्रिसमसपर्यंत बाहेर काढू, तज्ज्ञाचा दावा

उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा आज 14 वा दिवस आहे. आज (25 नोव्हेंबर) सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढले जाईल, अशी आशा होती, मात्र पुन्हा एकदा ती आशा धुळीस मिळाली. अशात आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी बचाव कार्यासंदर्भात एक दावा केल्याने चिंता वाढली आहे. (14th day of the ongoing rescue operation to rescue 41 laborers trapped in the Silkiara Tunnel in Uttarkashi)

“आतील कामगार सुरक्षित आहेत, आम्ही ख्रिसमसपर्यंत सर्व 41 कामगारांना बाहेर काढू”, असा दावा डिक्स यांनी केला आहे. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यासाठी एक महिना लागणार आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. याबाबत सरकार किंवा प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. शनिवारी सकाळी, ड्रिलिंग दरम्यान ऑगर मशीन बिघडल्यानंतर, कामगारांना बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील असे सांगण्यात आले होते. मात्र यानंतर बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांच्या दाव्याने सर्व देशाला चिंतेत टाकले आहे.

मुदतीबद्दल अंदाज लावू नका

दुसरीकडे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) प्रसारमाध्यमांना बचाव कार्य पूर्ण करण्याच्या वेळेबद्दल अंदाज न लावण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे चुकीचा संदेश जात आहे, असे त्यांनी सांगितले आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शिवाय सर्व मदतीसाठी सहकार्य करीत आहेत. ते सध्या घटनास्थळावरच तळ ठोकून आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Video : ‘हे प्रदर्शन करु नका…’; शहीद जवानाच्या आईसमोर मंत्र्यांचा लाजिरवाणा पब्लिसीटी स्टंट

भूगर्भातील बोगदे तज्ञ म्हणून जगभरात ओळख

मजुरांच्या सुटकेसाठी तज्ञ अर्नोल्ड डिक्स यांच्यासह ONGC, SJVNL, RVNL, NHIDCL आणि THDCL उत्तरकाशी बोगद्याच्या बचाव कार्यासाठी तळ ठोकून आहेत. अर्नोल्ड डिक्स हे ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत. ते आंतरराष्ट्रीय टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अर्नोल्ड डिक्स यांनी आजतागायत अनेक बचाव कार्ये यशस्वीपणे पार पाडली आहेत. त्यामुळे उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे.

सौम्या विश्वनाथ हत्याकांडातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, साकेत कोर्टाचा निर्णय

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी 11 दिवसांपासून मशीन्स सतत काम करत आहेत, टीम मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या कामात गुंतलेल्या लोकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक अडथळ्यांमुळे बचावकार्य मध्यंतरी थांबवावे लागले, मात्र पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे. अर्नोल्ड डिक्स घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी बचावकार्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बोगद्याची पाहणी केल्यानंतर अडकलेल्या 41 मजुरांना नक्कीच बाहेर काढले जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube