सौम्या विश्वनाथ हत्याकांडातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, साकेत कोर्टाचा निर्णय
Soumya Vishwanath Murder Case : टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथ (Soumya Vishwanath ) हत्या प्रकरणात चारही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2008 मध्ये सौम्या यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला पंधरा वर्षाहून अधिक काळ लोटला असून आता साकेत कोर्टाने या हत्येप्रकरणी रवी कपूर (Ravi Kapoor, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
YRKKH Twist: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये अखेर अभिरा अन् अरमानच्या लग्नात नेमकं काय घडणार?
न्यायालयाने चार आरोपींना दंडही ठोठावला आहे. सर्व दोषींना मकोका अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. चारही आरोपींना दोन वेगवेगळ्या प्रकरणात जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दिल्लीस्थित महिला टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची 30 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीतील नेल्सन मंडेला रोडवर हत्या करण्यात आली होती. रात्री 3 वाजताच्या सुमारास सौम्या नाईट शिफ्ट करून ऑफिसमधून घरी परतत असताना गोळ्या झाडून त्यांचा खून झाला. पोलिसांना सौम्याचा मृतदेह त्यांचा कारमध्ये सापडला. या खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना तब्बल ६ महिने लागले.
Rahul Gandhi यांचं वंचित बहुजन आघाडीच्या ‘त्या’ पत्राला उत्तर, पत्रात नेमकं काय म्हटलंय?
सौम्या यांची हत्या दरोड्याच्या उद्देशाने झाल्याचा पोलिसांचा दावा केला होता. यानंतर या हत्येप्रकरणी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी यांना अटक करण्यात आली होती. जे 2009 पासून पोलिसांच्या ताब्यात होते.
दरम्यान, आज सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी सौम्या यांच्या आईला विचारले की काही सांगायचे आहे का? यावर पीडितेच्या आईने सांगिले की, 15 वर्षां तरी न्याय मिळाला पाहिजे. माझे पती आयसीयूमध्ये दाखल असून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. यानंतर साकेत न्यायालयाने सौम्या विश्वनाथ खून प्रकरणात पोलिसांनी चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर पाचव्या दोषीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
शिक्षा सुनावताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार पांडे यांच्या न्यायालयाने दोषी रवी कपूरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रवी कपूरला आयपीसी 302 अन्वये 25 हजार रुपये दंड आणि आयपीसी 302 अन्वये 25 हजार रुपये दंड तर मकोका अंतर्गत 1 लाख रुपये दंड ठोठावला. अमित शुक्लाला आयपीसी कलम 302 अन्वये जन्मठेपेसह 25 हजार रुपये दंड आणि मकोका अंतर्गत 1 लाख रुपये दंड, अजय कुमारला दंड IPC 302 अन्वये 25 हजार रुपये आणि MCOCA अंतर्गत 1 लाख रुपये दंड. बलजीत मलिक याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत जन्मठेपेसह 25 हजार रुपये दंड आणि MCOCA अंतर्गत 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायालयाने पाचवा दोषी अजय सेठी याला आयपीसी कलम 411 आणि मकोका अंतर्गत 3 वर्षांची शिक्षा आणि 7.25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.