Download App

कॉम्रेड व्ही.एस. अच्युतानंदन यांना अभिवादन; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘माकप’ची सभा संपन्न

केरळचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड व्ही.एस. अच्युतानंदन यांनी तिरुवनंतपुरमच्या खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

  • Written By: Last Updated:

Comrade V.S. Achuthanandan Remembrance : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, केरळचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड व्ही.एस. अच्युतानंदन यांच नुकतच निधन झालं. तिरुवनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात (Comrade) उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते १०१ वर्षांचे होते. अच्युतानंदन यांनी २००६ ते २०११ या काळात केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. दरम्यान त्यांना आज छत्रपती संभाजीनगर येथे कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) जिल्हा समिती व जनसंघटना यांनी येथील सिटू भवन अजबनगर येथे अभिवादन सभेच्या माध्यमातून अभिवादन केलं.

यावेळी कॉम्रेड प्रकाश पाटील यांनी सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. तर, पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड भगवान भोजने यांनी अभिवादनपर भाषण केलं. ते म्हणाले, भारतीय राजकारणात असे काही नेते आहेत, ज्यांनी केवळ सत्तेसाठी नव्हे तर तत्त्वांसाठी आपले आयुष्य झोकून दिलं. व्हि.एस अशाच नेतृत्वाचा झगमगता दीपस्तंभ ठरले. पक्षाने त्यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करताना त्यांचा लढवय्या प्रवास जनतेला पुन्हा आठवला – एक नेतृत्व जे अन्यायाविरुद्ध ठाम राहिले आणि गरीब, कामगार, शेतकरी, वंचितांच्या न्यायासाठी अखेरपर्यंत झगडले अशा शब्दांत त्यांना भोजने यांनी अभिवादन केलं.

प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे राज्यात पडसाद; मराठवाडा विद्यापीठात एसएफआयडून निदर्शने

किसान सभेचे कॉम्रेड भाऊसाहेब झिरपे अभिवादनपर बोलतााना म्हणाले, १९२३ मध्ये केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यात जन्मलेले अच्युतानंदन लहानपणीच अनाथ झाले. शिक्षण पूर्ण करता येणार नाही, अशी परिस्थिती त्यांच्या वाट्याला आली. पण याच संघर्षातून त्यांच्या मनात सामाजिक असमानतेविरोधात जळणारी आग निर्माण झाली. वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांनी मजूर चळवळीत पाऊल ठेवले आणि पुढे शेतकरी, कामगार चळवळींचा अविभाज्य भाग झाले अशी आठवण त्यांनी यावेळी विषद केली.

सिटूचे कॉम्रेड मानकापे अभिवादनपर बोलतांना म्हणाले,  १९४० च्या दशकात व्हि. एस.यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सक्रिय सहभागामुळे केरळमधील शेतकरी-श्रमिक आंदोलनांना नवं बळ मिळालं. अच्युतानंदन यांनी केवळ राजकीय व्यासपीठावरच नव्हे तर रस्त्यावर उतरून संघर्षाचे नेतृत्व केलं. भूमिहीन शेतकऱ्यांच्या कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक मोर्चे काढले, आंदोलने केली.

एआयएलयूचे कॉम्रेड बाबासाहेब वावळकर अभिवादनपर बोलताना म्हणाले की,  २००६ साली अच्युतानंदन केरळचे मुख्यमंत्री झाले. या काळात त्यांनी भ्रष्टाचारविरोधी मोहिमा, पर्यावरण रक्षण, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण आणि सामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यांनी राज्यातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या, तसंच मूळ भूमिपुत्रांच्या हक्कांचं रक्षण केलं. त्यांच्या कार्यशैलीमुळेच ‘जनतेचा मुख्यमंत्री’ अशी ओळख त्यांना मिळाली.

एमएसएमआरए चे कॉम्रेड विशाल भुमरे यांनी अभिवादनपर बोलतांनी कॉम्रेड अच्युतानंदन यांच्या नेतृत्वाची सर्वांत मोठी ताकद म्हणजे तडजोड न करणारे, स्पष्ट बोलणारे आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व. सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी कधीच तत्त्वांशी तडजोड केली नाही. मुख्यमंत्री असताना सुद्धा साधा राहणीमान, साधी राहणी आणि प्रामाणिक प्रशासन हा त्यांचा ठाम दृष्टिकोन होता. आशा वर्कर्स युनियन च्या कॉम्रेड मंगला ठोंबरे यांनी म्हटलं की, कॉम्रेड अच्युतानंदन यांनी आपल्या जीवनातून आम्हाला शिकवलं की राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसते, तर समाजपरिवर्तनासाठी असते. त्यांच्या कार्याची प्रेरणा आमच्या भावी पिढ्यांना योग्य मार्ग दाखवत राहील.

एसएफआयचे कॉम्रेड अरुण मते म्हणाले, कॉम्रेड व्ही.एस. अच्युतानंदन हे नाव आजही केवळ केरळपुरते मर्यादित नाही, तर देशभरातील प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ राजकारणाच्या चर्चेत आदराने घेतले जाते. त्यांनी उभारलेला संघर्षाचा वारसा, सामान्य माणसाच्या न्यायासाठी दिलेली झुंज आणि आयुष्यभर जपलेली साधेपणाची मूर्ती हे आजच्या पिढीला नवा दृष्टिकोन देतात. व्हि. एस चा काम पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. अशा या लढवय्या नेत्याला लाखो कार्यकर्त्यांकडून आणि जनतेकडून सच्च्या मनाने लाल सलाम.  या प्रसंगी ऍडव्होकेट कॉम्रेड सचिन गंडले, कॉम्रेड श्रिकांत फोफसे, कॉम्रेड रविंद्र शिरसाट,सिटूचे कॉम्रेड अजय भवलकर, कॉम्रेड राहुल धर्माधिकारी, समाधान बारगळ, राजेंद्र राठोड व कार्यकर्ते उपस्थित होते.

follow us

संबंधित बातम्या