Download App

रितेश आणि जेनिलियाला ‘या’ प्रकरणात मिळली क्लीन चिट, जाणून घ्या प्रकरण

Riteish Deshmukh MIDC Land Case: बॉलिवूड असो वा मराठी सिनेसृष्टी… यामधील एक फेमस कपल असलेले रितेश- जेनिया यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची मालकी असलेल्या एका कंपनीला लातूरमध्ये (Latur MIDC) देण्यात आलेल्या भूखंडप्रकरणी चौकशी सुरू होती. यानंतर आता सहकार विभागाचा अहवाल आला आहे. रितेश आणि जेनिलिया देशमुख यांना सहकार विभागाकडून क्लीनचिट मिळाली आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर लातूरमधील रितेश आणि जेनिलिया यांच्या मालकीच्या भूखंडाची चौकशी करण्यात आली. दरम्यान रितेश – जेनिलियाने लातूर MIDCमध्ये देश अँग्रो. नावाची प्रा. लि. कंपनी सुरू केली होती. या कंपनीसाठी 120 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलं होतं. या कंपनीच्या जागेवरून आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जावरून हा वाद निर्माण झाला होता. देश अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला महिन्याभराच्या आतच 120 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याचा आरोप स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता.

आरोपानंतर चौकशी अन् क्लीन चिट
लातूर एमआयडीसीच्या भूखंड चौकशी अहवालात जिल्हा उपनिबंधकांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर आधारित रिपोर्ट देखील समोर आला आहे. या प्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून चौकशीदरम्यान कंपनीशी संबंधित कोणतेही अनियमितता आढळून आली नाही, असे समोर आले आहे. त्यामुळे रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी क्लीन चिट मिळाली आहे.

भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर

भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप
लातूर एमआयडीसी भागात 2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकांची प्रतीक्षा यादी होती. मात्र, प्रतिक्षा यादी डावलून रितेश-जेनिलिया यांच्या देश अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भूखंड देण्यात आला, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.

Breaking! संस्था गटातून महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय…

विशेष म्हणजे अवघ्या 10 दिवसांत हा भूखंड त्यांना देण्यात आला. तसेच या कंपनीला एकाच महिन्यात 120 कोटी रुपयांचे कर्जही मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. लातूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले होते. अखेर सहकार विभागाचा अहवाल आला आहे. रितेश आणि जेनिलिया देशमुख यांना सहकार विभागाकडून क्लीनचिट मिळाली आहे.

Tags

follow us