Breaking! संस्था गटातून महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय…
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय झाला आहे. महाडिक यांनी 83 तर सचिन पाटील यांना 44 मते मिळाली.
डेव्हिड वॉर्नरने भुवनेश्वरला बघताच केला चरणस्पर्श, नंतर मारली मिठी; व्हिडिओ व्हायरल
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निकालाकडे लागलं होतं. अखेर या निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कारखान्याच्या पहिल्या निकालात 129 पैकी महादेवराव महाडिक यांना 83 मते तर विरोधी पॅनलचे सचिन पाटलांच्या कोट्यात 44 मते पडली आहेत.
दुपारी एक वाजेपर्यंत सत्तधारी गटाचे 21पैकी 8 उमेदवार हे चांगल्या मताधिक्यांनी आघाडीवर राहिले आहेत. सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार हे अमल महाडिक 1000 मतांनी आघाडीवर आहेत. सत्ताधारी आघाडीची दुसऱ्या फेरीमध्येही आघाडी कायम राहिली.
उत्पादक गटातून सत्ताधारी गटाचे शिवाजी रामा पाटील (3198), सर्जेराव बाबुराव भंडारे (3173), आणि अमल महादेवराव महाडिक (3358) तर विरोधी सतेज पाटील आघाडीमधील शिवाजी ज्ञानू किबिले (2261), दिलीप गणपतराव पाटील (2328), अभिजीत सर्जेराव माने (2184) पिछाडीवर आहेत.
Breaking news: काठमांडू विमानतळावरून दुबईला जात असताना विमानाला आग
चुरशीच्या ठरलेल्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत 9 पैकी 6 गटांत महाडिक गटाने बाजी मारली आहे. तर एकूण 5 फेऱ्यांमध्ये महाडिक गटाचे 13 उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. निकालानंतर महाडिक गटाची विजयाकडे घौडदौड सुरु झाली आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत कारण… आमदार भरत गोगावलेंनी सांगूनच टाकलं
दुसऱ्या फेरीअखेरीस महाडिक गटाचे 8 उमेदवार आघाडीवर होते, त्यानंतर तिसऱ्या फेरीअखेरीस महाडिक गटाचे विलास यशवंत जाधव 2934, डॉ. मारुती किडगावकर 3129, सर्जेराव पाटील 3051 मतांनी पुढे आहेत.विरोधी पॅनलचे सतेज पाटील गटाचे बळवंत गायकवाड 2158 मते, विलास पाटील 2068 मते आणि विठ्ठल माने 2361 मते पडली.
दरम्यान, राजाराम साखर कारखान्याचा पहिला निकाल हाती येताच महाडिक गटाच्या उमेदवारांकडून विजयाचा गुलाल उधळून जल्लोष करण्यात येत आहे.