Download App

Road Accident : भीषण अपघात ! खासगी बस पुलाखाली कोसळली; 25 जण जखमी

Road Accident : मागील काही दिवसांपासून रस्ते अपघातात (Road Accident) सातत्याने वाढ होत आहे. भरधाव वेगातील वाहने हे अपघातांचे मुख्य कारण ठरत आहे. आताही जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची (Jalna Bus Accident) बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर काल मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसच भीषण अपघात झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलाखाली कोसळल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. यातील 4 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

‘हाच पॅटर्न भाजपात रुजला’; पंकजा मुंडेंच्या कारखान्यावरील कारवाईवरून सुळेंचा घणाघात

याबाबत आधिक माहिती अशी, पूजा ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून नागपूरकडे निघाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास बस बदनापूर (जि. जालना) येथे आली असता अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील जखमींना सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या घटनेत  एकूण 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, महामार्गांवर वाहने भरधाव वेगात असतात. वेग नियंत्रित नसतो. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

पेन्शनचा प्रश्न चिघळला! लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात मतदान करण्याचा ठराव; पेन्शनर्स संघटना आक्रमक

 

दोनच दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. पायी जाणाऱ्या तरुणीसह एका दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणीसह दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला. तरुणी पायी घरी चालली होती. त्याचवेळी एका दुचाकीवर दोघे जण आळेफाट्याच्या दिशेने जात होते. या दरम्यान भरधाव वेगातील पिकअप रस्त्याने चालला होता. या पिकअपने काही कळण्याच्या आतच रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या तरुणीसह दुचाकीलाही धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील महिला आणि पायी चाललेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

Tags

follow us