Download App

महाराष्ट्र हादरला! स्विफ्ट कार अन् कंटेनरच्या धडकेत चौघे जागीच ठार; कारचा चक्काचूर

रविवारी अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. 

Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत मोठी वाढ (Road Accident) होत आहे. भरधाव वेगात वाहने चालवल्यानेच जास्त अपघात होत आहेत. आताही असाच भीषण अपघात मराठवाड्यात (Road Safty) घडला आहे. रविवारी अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. या अपघातातील सर्व मयत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्याती जगलपूर येथील आहेत. या मयतांची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे.

Road Accident : पायी जाणाऱ्या भाविकांना पिकअपने उडवले; चार जण जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा जगलपूर येथील चौघे जण स्विफ्ट कारने छत्रपती संभाजीनगरकडे निघालेह होते. रात्रीच्या वेळी या भागात जोरदार पाऊस सुरू होता. या पावसात समोरील काही दिसत नव्हते. ही स्विफ्ट कार अंबाजोगाई-लातूर रोडवर आली त्यावेळी समोरून येणाऱ्या कंटेवर आणि या कारची जोराची धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की कार थेट कंटेनरच्या खाली घुसली. कारमधील चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले. अपघात घडला त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसात समोरील काही दिसत नव्हते. त्यामुळेच कदाचित हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अपघात कशामुळे झाला याची निश्चित माहिती अजून तरी हाती आलेली नाही.

Pravin Dabas Accident: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा भीषण कार अपघात, गंभीर अवस्थेत ICU मध्ये दाखल

दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.

follow us