Road Accident : पायी जाणाऱ्या भाविकांना पिकअपने उडवले; चार जण जागीच ठार

Road Accident : पायी जाणाऱ्या भाविकांना पिकअपने उडवले; चार जण जागीच ठार

Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या काही केल्या कमी (Road Accident) होत नाही. या अपघातात रोज मृत्यू होत आहेत. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी हिंगोली जिल्ह्यातून (Hingoli News) समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावरील माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चार जण ठार झाले तर चार जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी घडली. अपघातातील जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मयत आणि जखमी व्यक्ती हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील आहेत. हे लोक सिरसम येथून पायी माळहिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात होते. माळहिवरा शिवारात असताना हिंगोलीकडून अमरावतीकडे जाणाऱ्या पिकअप वाहनाने या भाविकांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात मनोज गोपाळराव इंगेळे, बालाजी बाबूराव इंगळे, सतीश शंकरराव थोरात आणि वैभव नंदू कामखेडे यांचा मृत्यू झाला. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Road Accident : कार दुभाजकावर धडकली; भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.जखमीतील एका जणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला नेण्यात आले. तसेच पिकअप चालकाचा शोध घेण्यात आला. या पिकअप चालकाला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. वाहन चालवताना चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला अशी माहिती आता समोर येत आहे. मात्र खात्रीशीर माहिती अद्याप मिळालेली नाही.

दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.

Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर-कारच्या धडकेत तिघे जागीच ठार

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज