Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर-कारच्या धडकेत तिघे जागीच ठार

Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर-कारच्या धडकेत तिघे जागीच ठार

Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ (Road Accident) होत आहे. नव्याने बांधण्यात आलेला समृद्धी महामार्ग तर (Samruddhi Highway) नागरिकांसाठी मृत्यूचा सापळाच ठरला आहे. या महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. आताही शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास असाच भीषण अपघात महामार्गावर घडला. महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात घडली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कारमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढून नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. या जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मयत व्यक्ती या जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते. साईबाबांच्या दर्शनासाठी समृद्धी महामार्गाने हे भाविक कारने निघाले होते.

Road Accident : नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या बाजूला कंटनेर उभा होता. त्याचवेळी एक स्विफ्ट कार जालन्याहून शिर्डीच्या दिशेने निघाली होती. अचानक समोर कंटेनर दिसल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच कारने कंटेनरला मागच्या बाजूने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमधील तिघे जागीच ठार झाले.

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.

समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. बहुतांश अपघात पहाटे किंवा मध्यरात्रीच्या सुमारास झाले आहेत. आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त अपघात या महामार्गावर झाले आहेत. लोकांसाठी हा महामार्ग मृत्यूचा सापळाच ठरत आहे. यामध्ये आतापर्यंत 368 लोकांचा मृत्यू झाला आहे. चालकाला झोप किंवा डुलकी लागल्याने 183 अपघात झाले आहेत. तसेच टायर फुटून 51 अपघात झाले आहेत. तांत्रिक कारणांमुळे 200 अपघात घडले असून यात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज