Download App

Road Accident : मुलाची भेट राहूनच गेली.. ट्रकने चिरडल्याने महिलेचा मृत्यू

Road Accident : मागील काही दिवसांपासून रस्ते अपघात (Road Accident) सातत्याने घडत आहेत. समृद्धी महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हलर अपघातात बारा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात छत्रपती संभाजीनगर येथे घडला. मुलाला भेटण्यासाठी आलेल्या महिलेला ट्रकने चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कारवाई करतील या भीतीने ट्रक मागे घेत असताना मागच्या चाकाखाली आल्याने वृद्धेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नगर-आष्टी रेल्वेला लागलेली आग आता संशयाच्या भोवऱ्यात, थेट रेल्वे मंत्र्यांकडेच तक्रार

छत्रपती संभाजीनगरजवळील केंब्रिज चौकात ही घटना घडली. पुष्पाबाई वामनराव वाघ या अकोला येथून मुलाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्या होत्या. बसमधून उरतल्यानंतर त्या मुलाची वाट पाहत उभ्या असताना ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली. आई डोळ्यांसमोर निघून गेल्याने मुलाने एकच हंबरडा फोडला.  या घटनेने परिसरातही शोककळा पसरली होती.

महामार्गांवर वाहने भरधाव वेगात असतात. वेग नियंत्रित नसतो. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

Road Accident : भरधाव कंटेनर दुचाकीला धडकला; बाप-लेकीचा जागीच मृत्यू

समृद्धीवर अपघातांचे सत्र

नाशिक येथील इंद्रानगर येथे राहणारे जवळपास 35 भाविक खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने बुलढाणा येथील बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना समृद्धी महामार्गावर अगरसायगाव परिसरात त्यांच्या वाहनाला अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील एका टोलनाक्यावर एक ट्रक बाजूला घेतला जात होता. त्याचवेळी येत असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की मिनी बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.

Tags

follow us