बीड विवाहितेचा अत्याचार प्रकरण; आता पोलिस पाटील, ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होणार

Rupali chakankar- लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे, पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Beed Crime Rupali Chaknakar

Beed Crime Rupali Chaknakar

Rupali chakankar On Beed woman Crime : बीड जिल्ह्यात (Beed) पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडलीय. एका अल्पवयीन विवाहित तरुणीवर अत्याचार करून तिला गावाच्या चावडीत बांधून ठेवण्यात आले होते. या पीडितेला गावातील कोणीच मदतीला आले नव्हते. या घटनेला राज्य हादरले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लक्ष घातले आहे. पीडित मुलीचा बालविवाह लावून दिल्याचे निष्पन्न झालेले आहे. या बालविवाहाच्या दृष्टीनेही गुन्हा दाखल करून लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे, पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.

रुपाली चाकणकर यांनी तपास अधिकारी अतुलकुमार लांडगे यांच्याशी संपर्क करून तपासाबाबत माहिती घेत काही सूचना दिल्या आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 137(2),333,64(2)(i) आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वैभव पटेकर याला अटक करण्यात आली आहे.


महिलेबाबत नेमकी काय घटना घडली ?

पिंपळनेर तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय. संबंधित तरुणी आपल्या पतीसोबत रात्री घरात झोपली होती. उकाडा वाढल्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. याच संधीचा फायदा घेत आरोपी वैभव पटेकर हा घरात शिरला. घरातील सर्वजण झोपेत असताना त्याने पीडितेला जबरदस्तीने उचलून गावाबाहेर नेले. पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड हाताने दाबून ठेवले. आरोपीने तिला गावाबाहेरील नदीपात्रात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

अत्याचारादरम्यान पीडित तरुणी बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आरोपीने तिला गावात परत आणत चावडीसमोर असलेल्या खांबाला दोरखंडाने बांधून ठेवले. सकाळी शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणीने मदतीसाठी आक्रोश केला. मात्र, हा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर देखील काही काळ तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अखेर पीडितेच्या नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचून तिची सुटका केली.

Exit mobile version