Download App

छत्रपती संभाजीनगरमधून विजय फक्त माझाच; एक्झिट पोलचे आकडे मी मानत नाही -भुमरे

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेने शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी आपला दिड लाखाने विजय होईल असा अंदाज व्यक्त केला.

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आलाय. सगळेच पक्ष आपल्या किती जागा येणार याबद्दल दावे करत आहेत. आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी मोठा दावा केलाय. (Lok Sabha Election) तसंच, आपण हे एक्झिट पोलचे आकडे काही मानत नाही असंही ते म्हणाले आहेत.

विजय माझाच होणार  भुमरे आणि जलील यांना खैरे चितपट करणार? ही आहेत कारणं

या मतदारसंघात एमआयएम, ठाकरे गट आणि शिंदे गट अशी तिरंगी लढत आहे. यामध्ये ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे बाजी मारणार असल्याचा अंदाज टीव्ही 9 पोलस्ट्राट एक्झिट पोलने वर्तवला आहे. तर दुसरीकडे हे असले पोल आपण मानत नाही असं म्हणतं शिंदे गटाचे संदिपान भुमरे यांनी विजय माझाच होणार असा ठाम विश्वास असा व्यक्त केलाय .

खैरेंना कौल

मुख्य लढत ही इम्तियाज जलील (एमआयएम), चंद्रकांत खैरे (ठाकरे गट) आणि संदिपान भुमरे (शिंदे गट) आपले नशिब आजमावत आहेत. दरम्यान, यामध्ये खैरे बाजी मारत असल्याचं अनेक एक्झिट पोलामधून पुढे आलं आहे. मात्र, या अंदाजावर आक्षेप घेत भुमरेंनी आपल्या विजयाचा दावा केला आहे.

दीड लाखांनी विजयी होणार    मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात गारपिटीचा इशारा,  जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

शिवसेना फुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठी सहानुभूती असल्याचं चित्र आहे. त्यातच चंद्रकांत खैरेंनीही ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या या बोलण्याचा फायदा खैरेंना होईल अस बोललं जात आहे. भुमरेंना मात्र यातील एकही मुद्दा मान्य नाही. त्यांनी सर्व बाबी धुडकात एक ते दीड लाखांनी विजयी होणार असल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले भुमरे?

भुमरे म्हणाले, एक्झिट पोलचे आकडे मी मानत नाही. या पोलचे आकडे काहीही असोत, येथून फक्त माझाच विजय होणार आहे. या मतदारसंघातून एक ते दीड लाखांच्या मताधिक्यानी विजयी होणार आहे. हे 4 जूनला महाराष्ट्राला समजेल, असा विश्वासही भुमरेंनी यावेळी व्यक्त केला.

follow us