Sandipan Bhumre : ठाकरे गटाने 31 डिसेंबरपर्यंत राज्य सरकार कोसळेल असा दावा केला होता. यावरुन मंत्री संदिपान भुमरे (sandipan bhumre) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना झोपेत सुद्धा सरकार पडण्याच्या तारखा दिसतात. सरकार कधी जाणार हे सांगणारे संजय राऊत, उद्धव ठाकरे भविष्यकार आहेत. झोपीतून उठले की त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमचे सरकार दिसते. त्यांना रात्री झोपीत स्वप्न पडतात 1 तारीख 2 तारीख अशा तारखा दिसतात. ते सकाळी उठून माध्यमसमोर तेच बोलतात, असे म्हटले आहे.
22 तारखेला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाचे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. मात्र मंदिराच्या बांधकामासाठी 1 कोटी रुपये दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. यावर मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की त्यावेळी सर्वांचा सहभाग होता. कोणी किती पैसे दिले यापेक्षा राम मंदिर होत आहे याचा आनंद आहे. आम्ही अनेक वेळा अयोध्या दौरा केला आहे. पैशाला महत्त्व नाही. राम मंदिरासाठी त्यावेळी शिवसेनेतील सर्वानीच सहभाग दिला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान राजीव गांधी अन् काँग्रेस कार्यकर्ता; रामजन्मभूमीचे कुलूप वीस मिनिटात कसे उघडले ?
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत घ्यायचा आहे. अपात्रतेच्या कारवाईने शिंदे गटात भीतीचे वातावरण आहे का? यावर संदिपान भुमरे म्हणाले की आम्ही बिनधास्त आहोत. दहा तारखेच्या निकालाची आम्हाला धाकधूक वाटत नाही. समोरच्याला धाकधूक आहे. आम्ही जे काही केले ते कायदेशीर बाजू तपासून केलं आहे. आम्हाला न्याय देवतेवर विश्वास आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल, असे भुमरे यांनी म्हटले आहे.