Download App

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ‘त्या’ महिलेची हत्या ? अंजली दमानियांना संशय

मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय.

  • Written By: Last Updated:

Santosh Deshmukh murder case Anjali Damania makes sensational claim suspicious death of women in beed: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh) दररोज वेगवेगळ्या घटना समोर येत आहे. संतोष देशुमख यांची हत्या केल्यानंतर हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे भासविण्यासाठी आरोपींनी एक महिला तयार ठेवली होती, असा दावा केला जात होता. परंतु संबंधित महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरातच आढळून आलेला आहे. मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali Damania) यांनी एक्स पोस्टमध्ये केलाय. बीड पोलिसांच्या म्हणणानुसार महिलेचा घरात मृतदेह आढळलेला आहे. परंतु हा मृतदेह त्या महिलेचा नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अंजली दमानिया या पोस्टमध्ये म्हणतात, गुड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या ? तोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतंय. महिलेची ५ दिवसापुर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. ठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलीसांना ही बातमी कळाली आणि ते घटनास्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलीसाना कळाली आहे. अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतीक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असे असले तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे. शहरातील द्वारकानगरीत राहणाऱ्या लोकांना दोन दिवसांपासून उग्र वास येत होता. पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला आहे. मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.


पुरुषांना अडकविण्यासाठी महिलेचे अनेक नावे

ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची, त्यासाठी पाच नावे वापरायची. मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे-कळंब, मनीषा मनोज बियाणी-कळंब, मनीषा राम उपाडे-अंबाजोगाई, मनीषा संजय गोंदवले-रत्नागिरी असे पाच नावे ती महिला वापरत होती.

काय म्हणाले सुरेश धस?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात पुरावे संपवायला सुरूवात झाली का? मात्र हे जरी मोठं दिव्य असलं तरी ही केस आम्हाला शेवटरपर्यंत लढायची आहे. हे सर्व आरोपी फाशीवर जातील तेव्हा आम्हला सर्वांना आनंद होईल, अशी प्रतिक्रीया सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणासंबंधित महिलेच्या हत्येवर दिली आहे.

follow us