Download App

Dhananjay Deshmukh : ‘…म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही’, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारण

कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी पोलिसांनी प्रशासनाच्या नाकीनऊ आलंय. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला पकडले पाहिजे.

  • Written By: Last Updated:

Santosh Deshmukh : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमु (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर वाल्मिक कराडविरुद्ध उज्जल निकम (Ujjal Nikam) यांच्याकडे वकीलपत्र द्यावं, अशी मागणी होतेय. दरम्यान, निकम यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी याबाबत भाष्य केलं.

‘पत्नी मद्यपान करते म्हणजे क्रूरता नाही’, घटस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाचं वक्तव्य 

धनंजय देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्याला न्याय भेटला पाहिजे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्याकडे केली. आता एसआयटी, सीआयडीच्या पथकात बदल करण्यात आले. या हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली पाहिजे. आमच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून त्यांचीच नियुक्ती हवी. मुख्यमंत्री आणि उज्ज्वल निकम यांची भेट झाली आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस हे त्यांची नियुक्ती करतील, असं आम्हाला वाटतंय, असं देशमुख म्हणाले.

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील CIDचे तपास अधिकारी बदलले, नेमकं कारणं काय? 

पुढं ते म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. हे आरोप किती गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लक्षात येतं. या गुन्हेगारांवर त्याचवेळी कारवाई केली असती तर या घटना घडल्या नसत्या. कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी पोलिसांनी प्रशासनाच्या नाकीनऊ आलंय. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला पकडले पाहिजे. तसंच या सर्वांना कुणी आसरा दिला? त्यांचे कोणाशी बोलणे झाले, कोणी पैसे पाठवले? कोण त्या सर्वांना मदत करतंय? याचीही शोध घेऊन त्या सर्वांना अटक केली पाहिजे, असं देशमुख म्हणााले.

आज जबाब नोंदवणार नाही…
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुख हे आज केज कोर्टात त्यांचा जबाब नोंदवणार होते. मात्र, धनंजय देशमुख हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज केज कोर्टात उपस्थित राहणार नाहीत. याबाबत बोलतांना धनंजय देशमुख म्हणाले की, २६ डिसेंबर रोजी माझा जबाब झालेला आहे. मात्र, 64 ब नुसार पुन्हा जबाब दिला जातो. तो देण्यासाठी मी आज जाणार होतो. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याने उपचार घेणार आहे. त्यामुळं मी आज जबाब द्यायला जाणार नाही, असं ते म्हणाले.

follow us