Santosh Deshmukh Murder Case : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपपत्रात वाल्मिक कराडचा आरोपी (Walmik Karad) क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार एकच असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख आहे. त्यानंतर या आरोपपत्रात विष्णू चाटे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी नमूद केले आहे. आरोपी सुदर्शन घुले याच्या फोनवरुन वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. हा फोन कराडने 29 नोव्हेंबर रोजी केला होता. त्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांचा आरोपी सुदर्शन घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला.
7 डिसेंबरला सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला होता. जो उठेल आणि आपल्या आड येईल त्याला सोडणार नाही असे वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला सांगितले होते. वाल्मिक कराडशी बोलणे झाल्यानंतर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या कार्यालयात कॉल केला आणि धमकी दिली होती. पुढे 8 तारखेला सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि आणखी एक गोपनीय साक्षीदार यांची नांदूर फाट्यावरील एका हॉटेलमध्ये भेट झाली. त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला होता.
वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट असेल तर कारवाई करा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे स्पष्टच बोलले
दरम्यान, पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराडविरुद्ध सबळ पुरावे हाती आले आहेत. वाल्मिक कराडने आवादा कंपनीला खंडणी मागितली होती. यातून वाद झाला आणि या वादानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. वाल्मिक कराडने आवादा पवनचक्की प्रकल्प व्यवस्थापकाला फोन करून खंडणी मागितल्याचेही आता समोर आले आहे.
या हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना पाच महत्वाचे साक्षीदार सापडले. पाचही गोपनीय साक्षीदार आहेत. याच साक्षीदारांच्या जबाबानंतर पोलिसांनी वाल्मिक कराड विरोधात पुरावे गोळा केले. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा तपास एकत्रित करण्यात आला.
सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला होता. तेव्हा कराडने घुलेला सांगितले होते की जो तो उठेल आपल्या आड येईल त्याला सोडणार नाही. सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात हा संवाद झाल्यानंतर सुदर्शन घुले याने पुन्हा आवादा कंपनीत कॉल करुन धमकी दिली होती अशी माहिती या आरोपपत्रात देण्यात आली आहे. या आरोपपत्रानंतर वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास अधिक आवळला गेला आहे.
Video : स्वारगेटवरील ‘खळ्ळखट्याक’ वसंत मोरेंच्या अंगलट येणार?; अजितदादांनी दिले संकेत