बीडमध्ये वाल्मिक कराडची ‘बी टीम’ सक्रिय, धनंजय देशमुखांनी थेट नावच घेतली…

Dhananjay Deshmukh : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी बीड जिल्ह्यात (Beed) आता वाल्मिक कराडची (Walmik Karad) बी टीम सक्रिय झाल्याचा गंभीर आरोप केलाय. बीड जिल्ह्यात आरोपींची बी टीम अजूनही सक्रिय आहे. मात्र पोलिसांकडून (Beed Police) त्यांच्याकडे कानाडोळा केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच वाल्मिक कराडच्या कथित बी टीममधील चार जणांची नावं देशमुख यांनी जाहीर केली.
‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटातील रोमँटिक गाणे ‘ओ बावरी’ प्रदर्शित
बालाजी तांदळे, संजय केदार, डॉ. वायबसे आणि शिवलिंग मोराळे अशी चार जणांची नावं धनंजय देशमुख यांनी जाहीर करत त्यांच्यावर कधी कारवाई करणार? असा सवाल केलाय.
‘बी टीम’ अद्यापही बाहेर मोकाट
धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडे दोषी नसतील तर त्यांच्यावर कारवाई करू नका. पण, आरोपींना मदत करणारे जे लोक म्हणजेच ‘बी टीम’ अद्याप बाहेर मोकाट फिरत आहे, ते कुणाचे कार्यकर्ते आहेत, हे तरी शोधा. आम्ही कधीच निर्दोष लोकांवर कारवाई करा, असं म्हणालो नाही आणि म्हणणार नाही. पण, ज्यांचा दोष आहे हे आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी सांगतोय. ती हत्या प्रकरणातील बी टीम अद्याप बाहेरच आहे. त्यांची नावं आम्ही पोलिसांनी दिली. त्यांची तक्रारीही दाखल केली आहे. तरीही त्या लोकांवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही?, असा सवाल देशमुख यांनी केला.
‘या’ चित्रपटात दिसणार प्राजक्ताचा वेगळा अंदाज, प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवानी
बीडची बी टीम कोण चालवंतय? असा संतप्त करत देशमुखांनी बी टीममधील चार नावे माध्यमांसमोर सांगितली आहेत. आरोपीला सोडवायला गेलेले बालाजी तांदळे, ६, ९ आणि १२ तारखेला आरोपींचा फोन आलेले संजय केदार. फोन-पे वर पैसे पाठवणारे डॉ. वायभसे हे पंधरा दिवस गायब होते. त्यांची पोलिसांनी चौकशी केली आणि त्यांना सोडून दिलं. सुनावणीला जे आरोपी येतात, त्यावेळी त्यांची बी टीम त्यांच्यासोबत असते, असा दावा देशमुखांनी केला.
बालाजी तांदळे कोणासाठी काम करतो, हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. ज्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना सहकार्य केलं, ते लोक कुणाचे आहेत याचं उत्तर द्या, असं धनंजय देशमुख म्हणाले.