Download App

संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपाने मारहाण.., पॉस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली.

  • Written By: Last Updated:

Beed Santosh Deshmukh Postmortem Report: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली. हे हत्या प्रकरण राज्यात चर्चेचा विषय बनलं. या खून प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट (Postmortem Report) समोर आला. या पोस्टमार्टम रिपोर्मध्ये धक्कादायक माहिती आली.

… तर पुरुषांना दोन लग्न करावे लागेल, नितीन गडकरी असं का म्हणाले? 

संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट आला. एकूण 8 पाणाचा हा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे. रिपोर्टमध्ये संतोष देशमुख यांना जबर मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. गंभीर मारहाणीमुळे देशमुख यांच्या शरीरातून रक्तस्त्राव झाला. त्यामुळं देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झालं. देशमुख यांच्या छातीवर, डोक्यावर, हाता- पायावर आणि चेहऱ्यावर जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे त्याचा चेहरा आणि डोळे काळे-निळे झाले होते. त्यांचा मृत्यू ‘हॅमरे टू मल्टिपल इन्जुरिजमुळे’ झाल्याचं या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलं.

‘…तर मी विधानसभा लढलोच नसतो’; अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं वक्तव्य 

देशमुख यांच्या शरीरावर 56 जखमा
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार संतोष देशमुख यांच्या शरीरावर एकूण 56 जखमा आहेत. डोळ्यांना मारहाण करण्यात आली. मात्र, डोळे जाळण्याच्या प्रकाराला राज्य जिल्हाशल्य आणि आरोग्य विभागाने दुजोरा दिला नाही. पाठीवर सर्वाधिक मुका मार देण्यात आला. त्यांना लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. मात्र अंगावर कुठेही फॅक्चर नाही, संतोष देशमुख यांना दीड तास मारहाण करण्यात आल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं. एकूण 3 डॉक्टरांच्या पथकाने देशमुख यांचे शवविच्छेदन केले.

चार आरोपींना अटक…
दरम्यान, मारहाण करणाऱ्या तरुणांनी संतोष देशमुख यांना अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केली. दरम्यान, या हत्ये प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी तीन आरोपींना अटक केली. तर आज आरोपी विष्णू चाटे याला अटक केली. त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 झाली आहे. विष्णू चाटे याच्यावर खुनाचा कट रचल्याचा आरोप आहे.

हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे…
मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. आता या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. तसंच वाल्मिक कराड यांच्यावरही खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

follow us