‘…तर मी विधानसभा लढलोच नसतो’; अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं वक्तव्य
Ram Shinde : गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे राम शिंदे (Ram Shinde) यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभापती राम शिंदे यांचे अभिनंदन करताना जोरदार टोलेबाजी केली. राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळेच त्यांनी सभापतीपदाची संधी मिळाल्याचे अजितदादा म्हणाले. यावर आता राम शिंदे यांनी भाष्य केले आहे.
भाजप असो वा कॉंग्रेस, मुंबईला तोडण्याची भाषा खपवून घेणार नाही; आदित्य ठाकरे कडाडले
अजित पवारांनी हेच निवडणुकीच्या आणि महायुतीच्या बैठकीत सांगितलं असतं तर मी लढलोच नसतो, असं राम शिंदे म्हणाले.
राम शिंदेंनी आज विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी माझ्या नावाचा ठराव मांडला. या ठरावाला साथ आणि सहकार्य देत विरोधी पक्षाने एकमताने ठराव मंजूर करण्यासाठी सहमती दिली. हे सभागृहातील चांगल्या वातावरणाचं द्योतक आहे. सभागृहात अनेकांनी माझ्या राजकीय पट मांडला, अभिनंदन केलं. आता या पदावर काम करण्याची संधी मिळाल्याने येणाऱ्या विधिमंडळाच्या कामकाजात उजवा-डावा न करता किंवा सत्ताधारी-विरोधी असा दुजाभाव न करता सभापती म्हणून महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याची माझी भूमिका असेल, असं राम शिंदे म्हणाले.
आधुनिक अभिमन्यू, ईव्हीएम अन् विरोधक, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात तुफान फटकेबाजी
सभापदी निवड झाल्यानंतर राम शिंदेंचे अभिनंदन करतांना अजित पवारांनी मी तुमच्या मतदारसंघात सभा घेतली नाही, म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला. तुमचा पराभव झालाय. पण, एका अर्थाने ते योग्य झालं. पराभव झाल्यामुळेच तु्म्हाला सभापतीपदाची संधी मिळाल्याचे अजितदादा म्हणाले. याविषयी विचारले असता राम शिंदे म्हणाले की, अजित पवार यांनी जे भाषण केलं की, तुम्ही म्हणाला प्रचाराला आलो नाही आणि आता पराभव झाल्यानंतर तुम्ही सभापती झाला. हा नियतीचा खेळ आहे काय, हे मला माहिती नाही… पण, त्यांना जर हेच करायचं होतं, तर ते त्यांनी निवडणूकच्या आधी सांगायला पाहिजे होतं. किंवा महायुतीच्या बैठकीत सांगायला हवं होतं. त्यांनी सांगितलं असतं तर मी लढलोच असतो, असं राम शिंदे म्हणाले. त्यांना जर असचं करायचं होतं, तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं, असंही ते म्हणाले.