Download App

“धस, मुंडे अन् कराड एकाच नाण्याच्या बाजू, स्वार्थासाठी त्यांची..”, धस-मुंडे भेटीवर राऊत कडाडले

मला बीडची काही लोकं वारंवार सांगत होती की धस, मुंडे आणि कराड एकच आहेत. एका नाण्याच्या या तीन बाजू आहेत.

Sanjay Raut Criticized Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राज्यभरात निघालेल्या मोर्चातही सुरेश धस यांच्या निशाण्यावर धनंजय मुंडे होते. संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी लढाई अधिक तीव्र करण्याचाही इशारा त्यांनी दिला होता. मग अचानक धस मुंडे भेटीची बातमी बाहेर आली आणि राजकारणच फिरलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही (Sanjay Raut) सुरेश धस यांच्यावर घणाघाती टीका केली.

सुरेश धस कधीही पलटतील खात्री होती म्हणूनच.. मुंडे भेटीवर अंजली दामानिया संतापल्या

राऊत म्हणाले, सुरेश धस हे कधीही पलटी मारतील ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आहे. धस यांनी ही कृती केली असेल तर देव त्यांना क्षमा करणारा नाही. ते पाप आहे. विश्वासघात पेक्षाही पुढले पाऊल आहे. बीडमधील काही नेत्यांनी मला धस यांच्यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते. धस कधीही पलटी मारतील. सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दु्र्दैवाने हे सत्य होताना दिसत आहे.

यानंतर राऊत यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. भाजपा कार्यकर्ते थुंकले तरी विरोधक उडून जातील यावर बोलताना जनता तुमच्यावर लोकसभा निवडणुकीत थुंकली होती, तुम्ही पाप करून विधानसभा जिंकली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, एकनाथ शिंदे यांच्यावर मोदी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सोबत घेतले अशी टीका संजय राऊत यांनी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत उबाठा गटाचे पानिपत करा असे आवाहन केले आहे यावर बोलताना करू द्या त्यांना आवाहन. एकनाथ शिंदे यांचा पक्ष अमित शहा यांच्या मालकीचा आहे. ते सांगतील ते एकनाथ शिंदे बोलणार. त्यांना सध्या पक्ष चालवायला दिला आहे असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

माणिकराव कोकाटे हे उपरे; माझ्या आग्रहामुळे शरद पवारांनी त्यांना..छगन भुजबळांचा कोकाटेंवर वार

पैसे वाटून मतदान घेतले

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही एक रुपयांत पीकविमा दिला असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, या सर्वांनी मतदारांना सुद्धा भिकारी समजून घराघरात पैसे वाटून मतदान घेतले अशी टीका केली.

follow us