सुरेश धस कधीही पलटतील खात्री होती म्हणूनच…, मुंडे भेटीवर अंजली दामानिया संतापल्या

Anjali Damania On Suresh Dhas : राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांची काही दिवसांपूर्वी गुप्त भेट झाल्याचं उघडकीस आल्यानंतर या प्रकरणावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरेश धस संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत आहे. मात्र त्यांनी धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्यावर आता चारही बाजूने टीका होत आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) , मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील सुरेश धस यांच्यावर मराठा समाजाला धोका देण्याचा आरोप केला आहे. तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील सुरेश धस यांच्यावर टीका करत सुरेश धस कधीही पलटतील यांची मला खात्री होती आणि हे मी धनंजय देशमुख ह्यांना देखील म्हटले होते. असं त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, खूप खूप खूप राग येतोय. किळस येतेय या राजकारणाची. एका सामान्य माणसाचा इतका क्रूर मृत्यू होतो तरी हे फक्त राजकारण करणार? मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्च्यात गेले नाही. मला खात्री होती की हे कधीही पलटतील. मी हे धनंजय देशमुख ह्यांना देखील म्हटले होते. आज प्रश्न पडतो की धसांना हृदय आहे की नाही? धसांचे पाय कसे चालले? कसे गेले ते धनंजय मुंडेंची भेट घ्यायला? एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होता ना? इतके निर्दयी कसे हे राजकारणी? इतक्या मोर्च्यांमध्ये गेलात, इतके डायलॉग मारले ते फक्त नाटक होते? किळस आली आहे ह्या सगळयांची. असं अंजली दमानिया एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या.
खूप खूप खूप राग येतोय. किळस येतेय या राजकारणाची. एका सामान्य माणसाचा इतका क्रूर मृत्यू होतो तरी हे फक्त राजकारण करणार?
मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्च्यात गेले नाही. मला खात्री होती की हे कधीही पालटतील. मी हे धनंजय देशमुख ह्यांना देखील म्हटले होते.…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 14, 2025
अंजली दामानिया यांनी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट या प्रकरणात काही पुरावे देखील दिले आहे.
मनोजदादांना गैरसमज, त्यांना भेटतो अन्…, जरांगे पाटलांच्या आरोपांवर धसांचं स्पष्टीकरण
तर दुसरीकडे आपण फक्त माणुसकीच्या नात्याने धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो होतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणात असणाऱ्या सर्व आरोपींना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. असं स्पष्टीकरण आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिले.