‘गंगाधर ही शक्तिमान है’! धसांनी विश्वास गमावला, मुंडे भेटीवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

  • Written By: Published:
‘गंगाधर ही शक्तिमान है’! धसांनी विश्वास गमावला, मुंडे भेटीवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare On Suresh Dhas : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर आता एका रुग्णालयात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

धनंजय मुंडे यांच्याशी भेट झाली असल्याची कबुली आमदार सुरेश धस यांनी दिल्यानंतर त्यांच्यावर आता चारही बाजूने टीका होत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील सुरेश धस यांनी समाजाला मोठा धोका दिला अशी प्रतिक्रिया दिली आहे तर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देखील सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत सुरेश धस बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहेत म्हटलंय.

सुरेश धस यांच्यावर टीका करत सुषमा अंधारे म्हणाल्या की, सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन बीडच्या जनतेचा विश्वास गमावला. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कधी ते पोलिसांना माफ करा म्हणतात, तर कधी धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात. ही संभ्रमावस्था ते का निर्माण करतात? ते फक्त स्वतःचा विश्वास गमवत नाहीत तर ते देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता सुद्धा गमवत आहेत अशी टीका त्यांनी केली.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस यांनी जो लढा उभा केला होता तो फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिथे राष्ट्रवादी आहे तिथे भाजपचा शिरकाव करण्यासाठीच होता आणि धस यांची मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणे आणि देवेंद्र फडणवीस यांची इमेज बाहुबली प्रस्तावित करणे एवढेच काम त्यांना करायचं होतं. आता ते काम फत्ते झाल्यानंतर आता एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्यानंतर काय फरक पडतो असं त्यांना वाटत असेल असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या.

राहुल गांधी ‘या’ दिवशी महाकुंभात लावणार डुबकी, यूपी काँग्रेसला तयारीचे आदेश

तसेच 18 पगड जातीने सुरेश धसांवर विश्वास दाखवला होता तो विश्वास त्यांनी मातीमोल ठरवला. त्यामुळेच गंगाधर ही शक्तिमान है असं आम्हाला खेदाने म्हणावं लागतंय असंही यावेळी त्या म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube