‘फक्त मनभेद…’ सुरेश धस अन् धनंजय मुंडेंच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट

‘फक्त मनभेद…’ सुरेश धस अन् धनंजय मुंडेंच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट

Chandrashekhar Bawankule On Suresh Dhas Dhananjay Munde Meeting : आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात समेट झाली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नवीन ट्विस्ट आलाय. यावर आता भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

बावनकुळेंची मध्यस्थी… धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात समझौता? गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

धनंजय मुंडे यांना ऑपरेशन नंतर भेटलो असल्याचं स्वत: सुरेश धस यांनी कबूल केलंय. तर केवळ रूग्णालयातच नाही तर सुरेश धस धनंजय मुंडेंना बावनकुळेंच्या घरी देखील भेटले, असं स्वत: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना सांगितलं (Maharashtra Politics) आहे. मी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत चार ते साडेचार तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहेत, मनभेद नाहीत असं मोठं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ते दोघंही खूप भावनिक आहेत. एका विषयावर थोडेच मतभेद आहेत. काही दिवसांत ते मतभेद दूर होतील. शेवटी माणसाच्या आयुष्यात असा काही काळ असतो, तो मतभेद दूर करतो. काही काळानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातील मतभेद दूर होतील. ते माझ्याकडेच भेटले आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट पारिवारीक होती. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.

लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून… मी महाकुंभमेळ्यात गंगेत स्नान केलं नाही; सुनील राऊत

सुरेश धस म्हणत आहेत की, मी मुंडेंना त्यांच्या ऑपरेशननंतर भेटलो होतो. तर दुसरीकडे बावनकुळेंनी देखील याआधी भेट झाल्याचं स्पष्ट केलंय. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट घडवून आणल्याचं म्हटलंय. यामुळे राजकीय वर्तुळात सुरेश धस यांनी आपली भूमिका बदलल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.

मी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत चार ते साडेचार तास होतो. त्यांचे मतभेद आहेत, मनभेद नाहीत. काही काळानंतर यांच्यातील मतभेद दूर होतील, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube