लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून… मी महाकुंभमेळ्यात गंगेत स्नान केलं नाही; सुनील राऊत

Sunil Raut On Ganga Snan At Mahakumbh : प्रयागराज येथे महाकुंभात (Mahakumbh) देश-विदेशातून भाविक स्नान करण्यासाठी येत आहेत. महाकुंभादरम्यान प्रयागराजच्या संगमात स्नान केल्याने पाप धुतली जातात, असं सांगितलं जातंय. यामुळे या पवित्र संगमात स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. दरम्यान आता यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनिल राऊत (Sunil Raut) यांनी वक्तव्य केल्याचं समोर आलंय. त्यांचं हेच वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
सुनील राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातील गंगा नदीतील पवित्र स्नानाबाबत आमदार सुनील राऊथ म्हणाले की, प्रयागराजच्या गंगा नदीतील पाप माझ्या अंगाला चिकटतील म्हणून मी पाण्यामध्ये उडी मारली नाही. मी महाकुंभ मेळ्यामध्ये सहभाग होण्यासाठी प्रयागराजला गेलो (Sunil Raut On Ganga Snan) होतो. तिथून आजच परतलो आहे. मुंबईत परत आल्यानंतर लोक माझ्या पाया पडत होते. मुंबईतील एका कार्यक्रमाला संबोधित करताना सुनील राऊत यांनी हे वक्तव्य केलंय.
शेतकऱ्यांसाठी सुखदवार्ता…रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू…पालकमंत्र्यांनी दिले आदेश
सुनील राऊत यांच्या वक्तव्यामुळं आता नवीन वाद उफाळण्याची शक्यता आहे. प्रयागराजमधील महाकुंभात दिग्गज नेते मडळींसोबत सेलिब्रेटिंनी देखील हजेरी लावलीय. करोडो लोकांनी महाकुंभादरम्यान गंगा नदीत स्नान केलंय. अनेकजण गंगा नदीत स्नान करतात, त्याचे फोटो सोशल मीडियावर देखील पोस्ट करतात. अशातच आता सुनिल राऊत यांच्या विधानाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून मी प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात गंगेमध्ये स्नान केलं नाही, असं ते म्हणाले आहेत.
राजन साळवींच्या पक्ष प्रवेशाने शिंदे गटात नाराजीचा सूर; पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत
आमदार सुनिल राऊत म्हणाले की, मी दोन दिवस प्रयागराजची मजा घेत होतो. कुणी किती पाप धुतले, ते पाहत होतो. हे पापं माझ्याच अंगाला चिकटेल, म्हणून मी पाण्यात डुबकी मारलीच नाही. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या वक्तव्याने आता नवा वाद उभा ठाकण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. विक्रोळी कन्नमवारनगरमधील शिवसेना ठाकरे गटाचा मिसळ महोत्सव या कार्यक्रमादरम्यान सुनिल राऊत बोलत होते. त्यांच्या वक्तव्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.