बावनकुळेंची मध्यस्थी… धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात समझौता? गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

बावनकुळेंची मध्यस्थी… धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात समझौता? गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

MLA Suresh Dhas Meet Dhananjay Munde : मस्साजोग प्रकरणी धनंजय मुंडे (Suresh Dhas) यांना कोडींत पकडणारे सुरेश धस यांच्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलीय. मागील काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी सुरेश धस हे सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप करीत होते. आकाचा आका, म्हणत आरोपांचा वर्षाव करत धस यांनी धनंजय मुंडेंना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. आता या दोघांच्या संघर्षात नवीन ट्विस्ट आल्याचं दिसत आहे. धनंजय मुंडेंवर आरोप करणारे सुरेश धस यांनी चक्क मुंडेंचीच भेट घेतल्याचं वृत्त समोर आलंय.

मोठी बातमी! आरबीआयकडून न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी, ठेवीदारांच्या पैशांच काय होणार?

काही दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस मंत्री धनंजय मुंडे यांना खाजगी रूग्णालयात भेटल्याचं समोर आलंय. ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. या भेटीमुळे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट झाल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. राजकीय दुश्मन बनलेल्या या दोघांमध्ये आता समेट झालीय का, अशी चर्चा सुरू आहे. या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खासगी रूग्णालयात धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी गुप्त भेट झाल्याचं समोर आलीय. ही एका खाजगी रूग्णालयात भेट झाली होती. मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेणारे सुरेश धस यांनी आता तलवार टाकलीय का, याची चर्चा होतेय. देशमुख प्रकरणी सर्वात जास्त आरोप सुरेश धस यांनी केले होते. त्यामुळे या भेटीत नेमकं काय झालं? भेटीनंतर आरोपांची धार बोथट होणार का, याकडे देखील आता राज्यातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे. राजीनाम्याची मागणी मी करत नसल्याचं देखील सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी ही भूमिका जाहीरपणे मांडली होती.

अंजली दमानिया या स्वतःच न्यायपालिका; अजितदादा गटाकडून जोरदार प्रत्युत्तर

याप्रकरणी आता सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आलीय. धस म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी धनंजय मुंडे यांना भेटलो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालं होतं. तेव्हा त्याच्या निवासस्थानी जावून भेटलो, असं ते म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालं होतं. तेव्हा लपून छपून नाही, तर दिवसाढवळ्या मी त्यांना भेटलो. तब्येतीची विचारपूस करायला त्यांना भेटलो.  देशमुख कुटुंबियांच्या लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच असणार, असं देखील धस म्हणालेत.

तब्येतीची विचारपूस केली, त्यात काय झालं? असा सवाल देखील धस यांनी उपस्थित केलाय. परवा मी त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलो होतो, तब्येतीची चौकशी करायला जाणं गैर नसल्याचं धस म्हणालेत. संतोष देशमुख प्रकरण आणि तब्येतीची विचारपूस या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांना जोडण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन धसांनी केलंय. तर पुढील काही दिवसांत मी आणखी खुलासे करणार आहे, असा देखील इशारा त्यांनी दिलाय. याप्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केल्याचं बोललं जातंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube