गुळाच्या सुरीनं नरडं कापलं, राजकीय सेटलमेंट…विश्वासघात; मुंडे-धसांच्या भेटीवर जरांगे पाटील संतापले

गुळाच्या सुरीनं नरडं कापलं, राजकीय सेटलमेंट…विश्वासघात; मुंडे-धसांच्या भेटीवर जरांगे पाटील संतापले

Manoj Jarange Patil On Suresh Dhas Dhananjay Munde Meeting : बीडचं (Beed) राजकारण चांगलंय गाजतंय. संतोष देशमुख हत्या प्रकरण अन् आरोप प्रत्यारोपांचं राजकारण यात रोज नवीन ट्विस्ट येत आहे. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात गुप्त भेट झाल्याचं उघडकीस आलंय. यावर मात्र आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे भडकल्याचं पाहायला मिळतंय.

‘फक्त मनभेद…’ सुरेश धस अन् धनंजय मुंडेंच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट

यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, गरिबांचे प्रश्न उचलले म्हणून पाठीशी उभे राहिले होतो. वाटलं नव्हतं की, इतक्या लवकर राजकीय सेटलमेंट होईल. विश्वासघात होईल असं वागू नये, असा टोला जरांगे यांनी सुरेश धसांना लगावला आहे. माझा समाज भोळा आहे. दगे फटके बसल्यावर तो नीटच करतो. धसांकडून ही अपेक्षा नव्हती. ज्याच्या टीमनं खून केलाय, त्यांच्याविरोधात धसांनी दंड थोपटले होते. त्याच्या नावाखाली काय झालंय, हे सांगू शकत नाहीये. मी खंबीर आहे, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

बावनकुळेंची मध्यस्थी… धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात समझौता? गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मला धक्काच बसला आहे. आम्ही भोळेत आहोत, आमच्या भोळेपणाचा फायदा राजकीय स्वार्थासाठी घेतला जात असेल तर ते योग्य नाही, असं जरांगे पाटील म्हणालेत. हे धक्कादायक आहे. ते खूर हुशार आहेत, भोळेपणाचं पांघरूण घेणं चांगलं नसल्याचं ते म्हणाले आहेत. मस्साजोगचं प्रकरण खूप संवेदनशील आहे. परंतु पक्षाच्या दबावाखाली येवून तुम्ही अशी भूमिका घेत असाल तर खूप धक्कादायक आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर विश्वास बसत नसल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

हा दुटप्पीपणा फारच भयानक आहेत. गुळाच्या सुरीनं नरडं कापल्याचं जरांगे पाटील म्हणालेत. ते चुकले असतील तर त्यांना समाज माफ करणार नाही. राजकारणाच्या आणि सत्तेच्या आहारी जावून जनतेशी दगाफटका करणं योग्य नाही. निवडणुकीत मराठा समाजाने 73 गावांची मतं फिरवण्याचं काम केलं होतं. ते धस इतक्या लवकर विसरले. त्यांनी देशमुख कुटुंबियांच्या डोक्यावर धरलेलं छत्र जाळून टाकलं. गुंडाच्या टोळीनं लोकांचे सपासप मुर्दे पाडले, अशा लोकांना तुम्ही भेटायला जाता? असा सवाल सुरेश धसांना त्यांनी केलाय.

इतका मोठा धोका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलेला नाही. भोळ्या भाबड्या समाजाने विश्वास टाकायचा अन् यांनी काळीज तोडून न्यायचं. त्यावर राजकारण शेकवायचं हे दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube