प्रदेशाध्यक्षांनी जेवायला बोलावलं अन्… ‘त्या’ गुप्त भेटीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं

Suresh Dhas on Meeting With Dhananjay Munde : मस्साजोग प्रकरणी धनंजय मुंडे (Suresh Dhas) यांना कोडींत पकडणारे सुरेश धस यांनी मुंडेंशी सेटलमेन्ट केली आहे का अशा चर्चांना उधाण आले आहे. कारण धनंजय मुंडेंवर आरोप करणारे सुरेश धस यांनी चक्क मुंडेंचीच भेट घेतल्याचं वृत्त समोर आलंय. यावर स्वचः सुरेश धस यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी काय म्हणाले धस पाहुयात…
निवडणुक आयोगाला मिळणार नवे आयुक्त; या अधिकाऱ्याचं नाव चर्चेत
यावेळी बोलताना धस म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला जेवायला बोलावलं होतं. त्यासाठी मी तिथे गेलो होतो. पण अचानकपणे तिथे धनंजय मुंडे आले. आमच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली. मात्र प्रदेशाध्यक्ष हे माझ्यापेक्षा फार मोठे आहेत. तरी देखील त्यांच्याकडून काहीतरी सांगण्यात चूक झाली असेल.
‘गंगाधर ही शक्तिमान है’! धसांनी विश्वास गमावला, मुंडे भेटीवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
मात्र त्यांनी आम्हाला हे प्रकरण मिटवता येईल का? असं वाक्य वापरलं होतं. पण मी त्याच वेळी क्लिअर कट त्यांना सांगितलं होतं की, हे प्रकरण चौकशी झाल्याशिवाय मिटणार नाही. त्याचबरोबर आमच्यामध्ये मनभेद नाहीत पण मतभेद तर आहेतच. त्यामुळे मी या प्रकरणात माघार घेणार नाही. असं मी त्यांना यावेळी स्पष्ट सांगितलं होतं.
गुळाच्या सुरीनं नरडं कापलं, राजकीय सेटलमेंट…विश्वासघात; मुंडे-धसांच्या भेटीवर जरांगे पाटील संतापले
तर पुढे बोलताना धस म्हणाले की, मी धनंजय मुंडे यांना परवा रात्री एक माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो होतो. त्यांना रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. मात्र मी त्यानंतर लगेचच त्यांच्यावरील आरोपांच्या संदर्भातील काही कागदपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सेटलमेंट झालेली आहे. असा दावा धस यांनी केला आहे.