मनोजदादांना गैरसमज, त्यांना भेटतो अन्…, जरांगे पाटलांच्या आरोपांवर धसांचं स्पष्टीकरण

Suresh Dhas On Manoj Jarange Patil: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर या प्रकरणात विरोधकांकडून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र आज या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.यानंतर सुरेश धस यांच्यावर आता चारही बाजूने टीका होताना दिसत आहे.
मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील सुरेश धस यांनी मराठा समाजाला धोका दिला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच गरिबांचे प्रश्न उचलले म्हणून पाठीशी उभे राहिले होतो. वाटलं नव्हतं की, इतक्या लवकर राजकीय सेटलमेंट होईल. विश्वासघात होईल असं वागू नये,असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहे. तर आता सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी सुरेश धस म्हणाले की, मनोज जरांगे आमचे दैवत आहे. काही गडबळीत ते काही बोलले असतील पण मी त्यांच्याशी बोलून घेईन असं या पत्रकार परिषदेमध्ये सुरेश धस म्हणाले. तसेच जरांगेदादा यांचा काही गैरसमज झाला असेल, मी फक्त धनंजय मुंडे यांना माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो होतो. मी दादांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांचा गैरसमज दूर करणार असेही यावेळी सुरेश धस म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते जरांगे पाटील ?
गरिबांचे प्रश्न उचलले म्हणून पाठीशी उभे राहिले होतो. वाटलं नव्हतं की, इतक्या लवकर राजकीय सेटलमेंट होईल. विश्वासघात होईल असं वागू नये. माझा समाज भोळा आहे. दगे फटके बसल्यावर तो नीटच करतो. धसांकडून ही अपेक्षा नव्हती. ज्याच्या टीमनं खून केलाय, त्यांच्याविरोधात धसांनी दंड थोपटले होते. त्याच्या नावाखाली काय झालंय, हे सांगू शकत नाहीये. मी खंबीर आहे. असं मनोज जरांगे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
मला धक्काच बसला आहे. आम्ही भोळेत आहोत, आमच्या भोळेपणाचा फायदा राजकीय स्वार्थासाठी घेतला जात असेल तर ते योग्य नाही, असेही जरांगे पाटील म्हणालेत. हे धक्कादायक आहे. ते खूप हुशार आहेत, भोळेपणाचं पांघरूण घेणं चांगलं नसल्याचं ते म्हणाले आहेत.
‘गंगाधर ही शक्तिमान है’! धसांनी विश्वास गमावला, मुंडे भेटीवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
मस्साजोगचं प्रकरण खूप संवेदनशील आहे. परंतु पक्षाच्या दबावाखाली येवून तुम्ही अशी भूमिका घेत असाल तर खूप धक्कादायक आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर विश्वास बसत नसल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.