Download App

..म्हणून ठाकरे गटाच्या माजी आमदाराचं संचालक पद गेलं

उस्मानाबाद : उद्धव ठाकरे गटाला उस्माबादेत मोठा धक्का बसला आहे. भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचं संचालक पद अपात्र ठरवण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर पाटील यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असल्या कारणाने त्यांचं जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचं संचालक पद गेलं आहे. दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याचं कारण विभागीय सहनिबंधकांकडून देण्यात आलं आहे.

Aaditya Thackeray : खोक्यासाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना जनता घरी पाठवणार!

तानाजी सावंतांची पुतणे माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंतांच्या तक्रारीनंतर या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. लातून विभागीय सहनिबंधक डॉ. ज्याोती मेटे यांनी लेखी आदेश देत ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Sharad Pawar यांची ही खेळी… पण धनंजय मुंडे यांना धक्काबुक्की का झाली?

या कारवाईनंतर आता पुढील पाच वर्षे जिल्हा बॅंकेची निवडणूक लढवता येणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

‘मी बीफ खातो, बीफ खाणं ही आमची जीवनशैली; याला कोणी रोखू शकत नाही; BJP च्या बड्या नेत्याचं वक्तव्य

दरम्यान, राज्यातील राजकीय सत्तांतरानंतर ठाकरे गटाला मिळणाऱ्या राजकीय धक्क्यांत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उस्मानाबाद येथे उद्धव ठाकरे गटाचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांची ओळख आहे.

Tags

follow us