‘मी बीफ खातो, बीफ खाणं ही आमची जीवनशैली; याला कोणी रोखू शकत नाही; BJP च्या बड्या नेत्याचं वक्तव्य

  • Written By: Published:
‘मी बीफ खातो, बीफ खाणं ही आमची जीवनशैली; याला कोणी रोखू शकत नाही; BJP च्या बड्या नेत्याचं वक्तव्य

शिलाँग : केंद्रातील मोदी सरकारमधील (Modi Govt) मंत्री आणि अनेक भाजप नेते गोमांसच्या (Beef) विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत असतात. अनेक भाजपशासित राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी कायदाही लागू करण्यात आलेला आहे. परंतु आता मेघालयचे भाजप प्रदेशाध्यक्ष एर्नेस्ट मावरी (Ernest Mowry) यांनी मोठं विधान केलं आहे. होय, मी बीफ खातो. आम्हाला बीफ खाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. बीफ खाणं हा येथील लोकांच्या जीवनशैलीचा भाग आहे, असं विधान मावरी यांनी केलं आहे. त्यामुळं आता मावरी यांच्या वक्तव्यामुळं भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मावरी यांनी गुरुवारी सांगितले की, राज्यात गोमांस खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मीही गोमांस खातो. गोमांस खाणं ही येथील लोकांची जीवनशैली आहे. त्यामुळे त्यावर कोणीही निर्बंध आणू शकत नाही, असं म्हणत मावरी यांनी भाजपालाच घरचा आहेर दिला आहे. मेघालयात विधानसभा निवडणुकीचं वातावरण पेटलेलं असतानाच मावरी यांनी गोमांस खाण्याविषयी वक्तव्य केल्यामुळं यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

मावरी म्हणाले की, इतर राज्यांनी गोमांस बंदीबाबत मंजूर केलेल्या ठरावावर मी विधान करू शकत नाही. आपण मेघालयात आहोत, येथे सगळे गोमांस खातात आणि यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मीही बीफ खातो. मेघालयात बीफ खाण्यावर कोणतीही बंदी नाही. ही लोकांची जीवनशैली आहे. याला कोणीही रोखू शकत नाही. भारतात असा कोणताही नियम नाही. काही राज्यांनी काही कायदे केले आहेत. मेघालयात आपल्याकडे कत्तलखाना आहे, जिथे प्रत्येकजण गाय किंवा डुक्कर घेऊन येतो. येथून बाजारात मांस आणलं जातं. हे पौष्टीक असल्याने लोकांना गोमांस खाण्याची सवय असल्यचाचं त्यांनी सांगितले आहे.

मेघालय व नागालँडमध्ये येत्या 27 फेब्रुवारीला विधानसभेची निवडणूक होणार आहे. अमित शहा यांनी गत आठवड्यातच येथील सर्व 60 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यातच मावरी यांनी हे विधान केल्यामुळे भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadanvis पहाटेचा शपथविधी : उर्वरित सत्य सुद्धा बाहेर येईल

दरम्यान, आगामी मेघालय विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी बाजी मारणार असल्याचा विश्वासही अर्नेस्ट मावरी यांनी व्यक्त केला. तसेच भाजपा ही ख्रिश्चनविरोधी आहे, हा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. भाजपा ख्रिश्चनविरोधी आहे, हा राजकीय अपप्रचार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube