अखेर पाच दिवसांनंतर कांतीलाल गिऱ्हे यांचं आदोलन मागं, अधिकाऱ्यांनी दिलं ठोस आश्वासन

आज त्यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस होता. अखेर त्यांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असल्याने गिऱ्हे यांनी आंदोलन स्थगित केलं आहे.

News Photo   2025 12 05T215342.855

अखेर पाच दिवसांनंतर कांतीलाल गिऱ्हे यांचं आदोलन मागं, अधिकाऱ्यांनी दिलं ठोस आश्वासन

मराठवाड्यात मागच्या दोन महिन्यांपूर्वी अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली होती. (Ashti) त्या काळात बीडच्या आष्टी तालुक्यातील चोभा निमगावच्या तलावाचं पाणी गावात शिरलं होत. त्याचबरोबर रोज शेजारील कडा, मिरजगाव या शहरात जाण्यासाठी असणारा रहदारीचा मार्ग तुटला होता. तसंच, शेतीही कापून गेली होती. त्या सगळ्या प्रश्नांकडं आष्टी प्रशासनाचं लक्ष नसल्याने सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिऱ्हे यांनी टोकाचं पाऊल उचललं होत. त्यांनी गावातील मुदत संपलेल्या ५० फूट पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

आज त्यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस होता. अखेर त्यांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असल्याने गिऱ्हे यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. गिऱ्हे यांनी गावातील नदीकाठचा मुख्य रस्ता नव्याने करावा, लघु पाटबंधारे प्रकल्पाचा सांडव्याचा आराखडा तयार करावा, नदीची संरक्षण भिंत बांधावी, वीज पुरवठा सुरळीत करावा या मागण्या केल्या होत्या. या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर आज गिऱ्हे यांनी आपलं टाकीवरील आंदोलन मागं घेतलं आहे.

जलसंपदा विभागाचे आकाश कदम म्हणाले, रस्ता लवकरात लवकर करण्यात येईल, सांडव्याचा पूर्वीचा नकाशा मागवून घेऊ आणि येत्या सहा महिन्यात सांडव्याचंही काम करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे. दरम्यान, गिऱ्हे यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सार्वजनीक बांधकाम विभागाचे कृष्णा पानसंबळ हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी वीज पुरवठ्याचे जे ७४ पोल मंजूर आहेत, त्याचीही तात्काळ व्यवस्था केली जाईल असंही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितंल आहे.

आमदार सुरेश धस याचं ब्रेनमॅपिंग झालं पाहिजे; खाडेंच्या हल्ल्यावरून शेख यांचा थेट आरोप

मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आष्टी तालुक्यातील कडा, चोभा निमगाव, टाकळी अमिया, धिर्डी, शिराळ, नांदा अशा गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. दरम्यान, तालुक्यातील अधिकारी कोणतंच काम युद्ध पातळीवर हाती घेत नसल्याने गिऱ्हे यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला होता. गेली पाच दिवसांपासून कांतिलाल गिऱ्हे हे गावातील पाण्याच्या टाकीवर होते. मोठ्या प्रमाणात थंडी असूनही त्यांनी त्याची फिकीर न करता आपल्या प्रश्नांवर ते अडून राहिले. अखेर आज प्रशासनाने त्यांच्या मगण्यांची दखल घेतल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागं घेतलं आहे. आता गिऱ्हे यांच्यावर कडा येथे उपचार सुरू आहेत.

आमदार सुरेश धस फिरकलेही नाहीत

वारंवार अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी जाणारे आष्टी विधानसभेचे विद्यमान आमदार सुरेश धस आपल्याच तालुक्यातील आणि ते राहतात त्या आष्टी शरहालगत असलेल्या चोभा निमगाव येथे कांतिलाल गिऱ्हे यांच्या  आंदोलनाकडे साधे फिरकलेही नाहीत. रोज तालुक्यातील आणि तालुक्याबाहेर चार-चार लग्नाला हजेरी लावणारे आमदार सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती गिऱ्हे यांच्या आंदोलनाकाडं आलं नाही. ज्या गावाने धस यांना नुकत्याच झालेल्या विधानसभेला मतांची मोठी लीड दिली त्या गावाकडं असं दुर्लक्ष केल्याने येणाऱ्या काळात त्यांना लोक धडा शिकवतील अशी नागरिकांच्या प्रतिक्रिया आता येत आहे.

Exit mobile version