Download App

Beed Crime : ज्यांना शस्त्रांची गरज नाही, त्यांचे परवाने रद्द करणार, बीडच्या एसपींची माहिती…

शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू असून गरज नसलेले शस्त्रे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - नवनीत कॉवत

  • Written By: Last Updated:

Navneet Kavat : बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी (Beed Crime) लक्षात घेता आता पोलीस प्रशासनाने शस्त्रे परवाने रद्द करण्याबाबत मोठं पाऊल उचललं आहे. शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू असून गरज नसलेले शस्त्रे परवाने (Weapons licenses) रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kavat) यांनी दिली आहेत.

… तरीही बायको सोडून गेली तर? वर्क लाईफ बॅलन्सबद्दल उद्योगपती गौतम अदानी स्पष्टच बोलले 

शस्त्रे परवाने रद्द करणार…
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना कॉवत म्हणाले, जेवढे शस्त्र परवाने आहेत, त्या सगळ्या परवान्यांचे चे अवलोकन सुरू आहे. कलेक्टर साहेबांशी माझी भेट झाली, आमच्यात चर्चा झाली. ज्यांच्याकडे शस्त्रे परवाने आहेत, त्या लोकांना शस्त्रांची खरचं गरज आहे का? आणि ज्यांना शस्त्रांची गरज नाही, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येईल, असंते म्हणाले.

शस्त्रे देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला आहे आणि पोलिस त्याचे अनॅलिसीस करतात. कायदा आणि सुव्यवस्थेच्या हिशोबाने आणि पास्ट हिस्ट्रीच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक फाईलचे अनॅलिसिस करणार. ज्यांना शस्त्रांची गरज नाही त्यांचे परवाने रद्द केले जातील, असं ते म्हणाले.

मोठी बातमी! प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानावर अखेर आमदार सुरेश धसांकडून दिलीगिरी 

…तर गुन्हे दाखल करणार
कॉवत पुढे बोलताना म्हणाले, आमचे एकच उद्दिष्ट आहे, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालू, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखू आणि कायद्याचे राज्य राबवू. ते म्हणाले की, बेकायदेशीर शस्त्रास्त्र प्रकरणी मी सांगितले होते की, जो कोणी युवक सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ द्वारे दहशत माजवता, तसं केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचे खून झाल्याचे दावे अंजली दमानिया यांनी केले होते. एका अज्ञात नंबवरून त्यांना याबाबत माहिती मिळाली होती. ही माहिती दमानिया यांनी पोलिसांना दिली होती. याबाबत विचारले असता कॉवत म्हणाले की, दमानिया यांनी जी माहिती दिली होती, त्याची आम्ही सखोल चौकशी केली आहे. चौकशीत निष्पन्न झालं की दारु पिऊन त्या माणसानं मेसेज केला होता, असं ते म्हणाले.

follow us