मोठी बातमी! प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानावर अखेर आमदार सुरेश धसांकडून दिलीगिरी
MLA Suresh Dhas On Prajakta Mali : आपला प्राजक्ता माळी यांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता मात्र माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आणि जर माझ्या विधानातून प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि इतर महिलांचा अनादर झाला असेल तर मी दिलीगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी दिली.
कोणाला इव्हेंट मॅनेजमेंट पाॅलिटिक्सचे शिक्षण घ्यायचे असेल तर त्याने परळीला यावं. तसं शिक्षण घ्यावं. प्राजक्ता माळीसुद्धा आमच्याकडे येतात. नवीन चित्रपट काढायचा असेल तर अशा मोठ्या विभूतींच्या तारखा, डेट कशा पद्धतीने मिळतात, प्राजक्ताताई देखील आमच्याकडे येतात, यासाठी जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न आहे. असं सुरेश धस म्हणाले होते. तसेच सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप करत त्यांना पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी देखील केली आहे.
तर दुसरीकडे आपल्यासाठी प्राजक्ता माळी विषय संपला असून मी त्यांची माफी मागणार नसल्याची भूमिका देखील सुरेश धस यांनी स्पष्ट केली होती मात्र आज त्यांनी दिलीगिरी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी या प्रकरणात भाष्य करत आपला प्राजक्ता माळी यांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. जर माझ्या विधानातून प्राजक्ता माळी आणि इतर महिलांचा अनादर झाला असेल तर मी दिलीगिरी व्यक्त करतो असं म्हटले आहे.
मेलबर्नमध्ये दारूण पराभव अन् भारत WTC मधून आऊट? जाणून घ्या नवीन समीकरण
महिला आयोगाकडून दखल घेताच धस नरमले
या प्रकरणात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे देखील तक्रार केली होती. याबाबत माहिती देत राज्य महिला आयोगाने X वर पोस्ट करत केलेल्या कारवाईची माहिती दिली होती.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झालाय. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्याबद्दल केलेले कथित अयोग्य, अवमानकारक व बदनामीकारण विधान तसेच त्यानंतर सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेल्या बदनामीकारक बातम्यांमुळे त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर त्याचे परिणाम होत असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं.
सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असून महिलेच्या प्रतिष्ठेस बाधा पोहोचवणारे असल्याने राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे, असं महिला आयोगाच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तर प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुरेश धस यांची तक्रार केली होती. त्यामुळे सुरेश धस नरमले असल्याचे बोलले जात आहे.