Download App

नामदेव शास्त्री : भगवान गडावरील 72 वर्षांचा दसरा मेळावा ते पंकजा मुंडेंना आशीर्वाद

अहमदनगर : भगवान गडावरील दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तब्बल 20 लाख अनुयायी दसरा मेळाव्याला भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर येत असतात. आज या परंपरेला तब्बल 72 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इथला दसरा मेळावा कसा असतो, याबाबत लेट्सअप मराठीने गडावरील महंत नामदेव शास्त्री यांच्याशी संवाद साधला. (Special interaction with Namdeo Shastri about 72 years of Dussehra Mela at Bhagwan Gad)

गडावरील दसरा मेळावा कसा असतो?

याबाबत बोलताना महंत नामदेव शास्त्री म्हणाले, 1951 साली भगवान बाबांनी सुरु केलेला हा दसऱ्याचा उत्सव आजतागायत चालू आहे आणि यापुढेही सुरु राहिलं. शिवाय आज भगवानगड स्थापनेचा वर्धापन दिनही आहे. जे श्रद्धाळू आहेत दिवसभर गडावर दर्शनासाठी येत असतात. भगवान बाबा त्यांचा प्राण आहे.

दसऱ्यादिवळी सकाळी भगवान बाबांच्या समाधीची पूजा होते, चार वाजता शिलांगण होतं, रात्री सात वाजता गुरुमंत्राचा कार्यक्रम असतो. अव्याहत चालत आलेली परंपरा आहे आणि अशीच पुढे चालत राहणार आहे. ज्यांच्या मागे संत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची कमी नसते.

आता बीआरएसमधील वंजारी नेत्याची पंकजा मुंडेंना टक्कर ! भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळाव्याची घोषणा

दिवंगत गोपीनाथ मुंडे हे प्रत्येक वर्षी भगवान गडावर दसरा मेळावा घेत असतं. लाखोंचा जनसमुदास भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि गोपीनाथ मुंडे यांचे भाषण ऐकण्यासाठी येत असे. या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते का? असे विचारले असता नामदेव शास्त्री म्हणाले, नक्कीच येते, तेवढे मोठे व्यक्तिमत्व होणार नाही.

सोबतच अनुयायी आजही तेवढ्याच संख्येने येतात, असे नामदेव शास्त्री यांनी नमूद केले. ते म्हणाले, भक्तांची संख्या कमी झालेली नाही. फक्त भाषण नसल्यामुळे येऊन-जाऊन आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे 25 कोटीचे मंदिर ऊसतोड कामगारांचे जीवावरच उभे होत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कमी नाही.

पंकजांचा राजळे, प्रितम मुंडेंना दिलासा! मेळाव्यातून म्हणाल्या, कोणाचे हिसकावून खाणार नाही

दरम्यान, “भगवान बाबावर श्रद्धा ठेवा, त्यांचा पाठिंबा घ्या, शिक्षण घ्या आणि मोठे व्हा, असा संदेश दसऱ्यानिमित्त नामदेव शास्त्री यांनी त्यांच्या अनुयायांना दिला. यावेळी पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्याला आपला आशीर्वाद आहे का? त्या ठिकाणी मोठा जनसमुदाय जमलेला आहे, तो पण भगवान बाबांना मानतो, आपल्याला मानतो. त्यांना काय तुम्ही काय संदेश द्याल? असे विचारताच सर्वे भवन्तु सुखिनः असा संदेश त्यांनी दिला.

Tags

follow us