भोंदू अशोक खरातला याला…, सुनिल तटकरे यांनी केली मोठी मागणी

अशोक खरात याला अजिबात सोडू नये, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, भोंदू अशोक खरातला फाशी दिली पाहिजे.

News Photo   2026 04 05T154240.516

भोंदू अशोक खरातला याला..., सुनिल तटकरे यांनी केली मोठी मागणी

भोंदूबाबा अशोक खरात (Kharat) यांचे दिवसागणीस नवे कारनामे समोर येत आहेत. या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जात असल्याने त्याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे.

भोंदू अशोक खरातचा पाय खोलात; कोट्यावधींचे संशयास्पद व्यवहार, ईडी छापा टाकणार?

खरात यांच्या सारख्या विकृत मनोवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्याला फाशीची शिक्षा देण्यास यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. तुळजापूर येथे त्यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. भोंदूबाबा अशोक खरातने हजारोंच्या घरात खरातने महिलांवर अत्याचार केला. महिला मानसिक धक्क्यात आहेत.

काही मोबाईल फोन खरात वापरत, त्या फोनमध्ये महिलांचे नंबर इतर नावाने सेव्ह असत. अशोक खरात याला अजिबात सोडू नये, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, भोंदू अशोक खरातला फाशी दिली पाहिजे. खरात असो कोणीही असो विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे, अशी मागणी सुनील तटकरे यांनी केली आहे. भोंदूबाबा अशोक खरातने ज्या प्रकारे महिलांचे शोषण आणि लोकांची फसवणूक केली आहे, ते पाहता त्याला कायद्यानुसार ‘फाशीची शिक्षा किंवा कठोरतम दंड मिळाला पाहिजे.

अशा प्रवृत्ती समाजात असणे घातक असून अशा प्रकारच्या विकृत मनोवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. भोंदू अशोक खरात प्रकरणाची राज्य सरकारने एसआयटीच्या माध्यमातून सखोल चौकशी करीत आहे. ज्यांचा ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असेही सुनील तटकरे म्हणाले. बारामती विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी म्हणून तुळजाभवानीला साकडे घातले, असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version