भोंदू अशोक खरातचा पाय खोलात; कोट्यावधींचे संशयास्पद व्यवहार, ईडी छापा टाकणार?

नाशिक तसंच शिर्डीतील मालमत्ता आणि 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर आहेत.

News Photo   2026 04 05T141159.303

भोंदू अशोक खरातचा पाय अजून खोलात गेला आहे. (Kharat) अनेकांना घाम फोडणारी आणि त्रस्त करणाऱ्या ईडीचा, सक्तवसुली संचालनालयाचा ससेमिरा आता खरातच्या मागे लागण्याची शक्यता आहे. तर त्याचवेळी अनेक संशयास्पद कोट्यवधीचे व्यवहार रडारवर आले आहेत. हे व्यवहार नेमके कुणाचे आहेत. या व्यवहारात कोण कोण आहेत, याची इत्यंभूत माहिती समोर येणार आहे.

महिला अत्याचारानंतर खरात याचे कोट्यवधींचे व्यवहार रडारवर आली आहेत. नाशिक तसंच शिर्डीतील मालमत्ता आणि 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर आहेत. अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत 100 तर जगदंबा पतसंस्थेत 32 खाती सापडली आहेत. या 132 खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे शिर्डी पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.

अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही; बावनकुळेंचा थेट बडतर्फीची इशारा

जगदंबा पतसंस्थेत इतर लोकांचे कागदपत्र वापरून खरात स्वत: 32 खाती ऑपरेट करत असल्याचे पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी कबुली दिली. तर समता पतसंस्थेतील 100 खात्यांमध्येही मोठे गौडबंगाल असण्याची शक्यता आहे. कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांमुळे अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

एका विशिष्ट तारखेला अशोक खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले का याकडे तपास यंत्रणांचे लक्ष वेधले आहे. एका विशिष्ट तारखेलाच खरात खाते उघडत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आल्याने यंत्रणा चक्रावल्या आहेत. ‘त्या’ तारखेमागील रहस्य काय ? पोलीस खात्यात चर्चेचा विषय ठरला आहे. ‘त्या’ तारखेला खरातने खाते उघडले आहे का ? त्याबाबत सर्व माहिती पोलिसांनी काही पतसंस्थाकडून मागवली आहे.

अनेक पतसंस्था आणि बँकांचे आर्थिक व्यवहार पोलीस यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. या पतसंस्था आणि बँकामध्ये खरातने कोणत्या तारखेला खाती उघडली. त्या तारखेला काय होते याचा तपास करण्यात येत आहे. तर आता कुणी कुणी त्याच्याशी व्यवहार केला आहे. त्यांची धाबे दणाणली आहेत. कारण याप्रकरणी त्यांची आर्थिक कुंडलीच यंत्रणांच्या हाती येणार आहे.

follow us