Suresh Dhas Meet Mahadeo Munde Family Wife and Mother Emotional : भाजप आमदार सुरेश धस यांनी परळी तालुक्यातील हत्या करण्यात आलेले महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी या कुटुंबाने आपली व्यथा धसांसमोर मांडली. तेव्हा या कुटुंबाला अश्रु अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. तर सुरेश धस यांनी या कुटुंबाला मुंडेंचे आरोपी सापडतील असं अश्वासन दिलं.
जास्त परताव्याचं आमिष, 700 ते 800 गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा; छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक घडलं
यावेळी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि आईने अश्रुंसह आपली व्यथा सांगितली. त्या म्हणाल्या की, ज्यांनी प्लॉटींग घेतली त्यांनीच माझ्या पतीला मारलं. त्यांना जसं मारलं तशीच शिक्षा त्या आरोपींना व्हायला हवी. माझ्या मुलांनी काय केलं. 14 फेब्रुवारीला जेव्हा शाळेत मातृपितृ दिन होता. त्यावेळी वडिल नसल्याने मुलं शाळेत जात नव्हती. कारण शाळेत आई-वडिलांचं पुजन केलं जात.
बॅलन्सशीट तपासू नका ती संघ स्वयंसेवकांची बँक; जनता सहकारी बँकेची शाहंना खात्री
तसेच ते गेल्या वर्षीचे फोटो पाहून रडत होते. असंही मुंडे यांच्या पत्नीने सांगितलं. त्यांचं पुर्ण भविष्य त्यांच्यासमोर आहे. त्यांच्यापासून वडिलांचं सुख हिरावून घेतलं गेलं आहे. त्यामुळे या मुलांकडे पाहुन तरी शासनाने त्यांच्या वडिलांचे मारेकरी शोधून त्यांना शिक्षा करावी. अशी मागणी यावेळी मुंडे यांच्या आई आणि पत्नीने केली आहे.
अजब मंत्री, गजब कारभार! तब्बल 20 महिने सांभाळलं ‘अस्तित्वात नसलेलं खातं’
त्यावर आमदार धस यांनी त्यांना महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. ते 100 टक्के सापडतील पोलिस त्यांना खोदून खोदून शोधतील. मात्र पोलिस म्हटलं की, आम्हाला चीड येते असंही यावेळी मुंडे यांच्या पत्नी म्हणाल्या. त्यामुळे आता मुंडेंचे मारेकरी कधी सापडणार? त्यांना शिक्षा कधी होणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यावर आता पुढे काय होणार
काय आहे प्रकरण?
महादेव दत्तात्रय मुंडे हे मुळचे परळी तालुक्यातील भोपळा गावाचे रहिवासी होते. पेशाने व्यावसायिक असलेले मुंडे 2022 च्या आसपास ते आंबेजोगाई या ठिकाणी राहण्यास गेले. पण 22 ऑक्टोबर 2023 या दिवशी परळी तहसीलदार कार्यालयासमोर त्यांचा खून झाला. त्यानंतर परळीतील वनविभागाच्या कार्यालयासमोरील आवारात त्यांचा मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्रांनी वार करत महादेव मुंडे यांचा खून झाल्याचे समोर आले होते. प्राथमिक तपासानुसार आर्थिक व्यवहारातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते.पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू झाला. मात्र आजपर्यंत हे सर्वच्या सर्व आरोपी फरार आहेत.