Download App

‘अजितदादा क्या हुआ तेरा वादा…’, सुरेश धसांचा परभणीतून हल्लाबोल, मुडेंनाही सुनावलं…

आकाच्या आकाला मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, अजितदादा क्या हुआ तेरा वादा, अशा शब्दात धस यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.

  • Written By: Last Updated:

Suresh Dhas : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणावरून मुंडेंवर कोणताही कारवाई केली नाही. यावरून भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला.

सहकारमहर्षी थोरात पुरस्कार डॉ. रावसाहेब कसबेंना, तर डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला 

आत्तापर्यंत बीड आणि परळी जिल्ह्यात खुनांची मालिका झाली, या हत्या कुणी केल्या? हत्येचे सूत्रधार कोण आहेत? याचा शोध घ्या, असं सांगतांनाच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात का ठेवलं आहे? अजितदादा, तेरा वादा क्या हुआ रे, असा बोचरा सवाल धस यांनी केला

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींच्या कठोर शिक्षेच्या मागणीकरिता परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार राजेश विटेकर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आदी नेते उपस्थित होते.

‘…तर आकाच्या आकालाही जेलवारी होणार’, सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा 

या मोर्चाला संबोधित करतांना धस म्हणाले की, जगात जर्मनी अन् देशात परभणी असं देशात नाव आहे. मी 18 महिने या परभणीचा पालकमंत्री होता. परभणीत किती रगेल आहे, हे मला माहित आहे. या परभणीत सोमनाथ सूर्यवंशी हा वकीलीचे शिक्षण घेणारा मुलगा पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्या कोम्बिंग ऑपरेशनची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी मस्साजोग प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावायला हवा, असंही धस म्हणाले.

ते म्हणाले, संतोषच्या हत्येप्रकरणी आयजी स्तरावर एसआयटी स्थापन करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी मान्य करण्यात आली. हे लोक पोलिसांकडून सुटणार तर नाहीतच. पण चुकून सुटले तरी न्यायालयीन चौकशीत पकडले पाहिजेत. त्यांना मकोका लागला पाहिजे. पोलिसांनी मकोका लावला की नमस्ते लंडन… पुन्हा हे माघारी येत नाहीत. आका तर आत गेलाच पाहिजे. जर आकाने यंटो बंटो केला असेल तर आकाच्या आकाचाही नंबर लागू शकतो. माणसं मारयाची लफडी आहेत यांची, असं धस म्हणाले.

आका जल्दी करलो तयारी
आमच्या लेकराने तुमचं काय बिघडवलं होतं? एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला आमचा संतोष गेला होता. जर आकाने त्याच्या आकाला मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल… तर त्यांनाही जेलची तयारी करावी, आका जल्दी करलो तयारी, निकलेंगी तेरी जेलवारी असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवरही टीका केली.

अजितदादा, क्या हुआ तेरा वादा
धस यांनीही अजित पवार यांच्यावरही टीका केली. धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश का करण्यात आला? असा सवाल धस यांनी उपस्थित केला. अजितदादांना म्हटलं, पाच टर्म आमदार असणाऱ्या प्रकाश सोळंकेंना मंत्री करा, राजेश विटेकर यांना मंत्री का आणि दोन्हीही नाही जमले तर बुलडाण्यातून निवडून आलेल्या कायंदेंना मंत्री करा. हवं तर आमचा जिल्हा पालकमंत्रीपदाविना ठेवा. काही फरक पडत नाही. पण आकाच्या आकाला (धनंजय मुंडे) यांना मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, क्या हुआ तेरा वादा, अशा शब्दात धस यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.

आतापर्यंतच्या हत्येची बेरीज करा, त्या कोणी घडवून आणल्या. त्याच्या मागचा मास्टरमाईंड कोण? हे जर तुम्हाला माहिती नसेल तर परभणीला आणि बीडला बारातमीची माणसं पाठवा, असं आव्हान धस यांनी केली.

रत्नाकर भाऊजी हे वागणं बरोबर नव्हं…
200-500 कुटुंबांनी शहर सोडले. काही गंगाखेड्यात चालले. गंगाखेडचे भाऊजी का नाही आले? रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठे अडकले आहेत माहीत नाही. डबल पॉलिसी हाणता की काय? इथे आमच्यासोबत आणि तिथे त्यांच्याही सोबत. पण रत्नाकर भाऊजी हे वागणं बरोबर नव्हं… खुल्लम खुल्ला आलं पाहिजे, असं धस म्हणाले.

follow us