‘…तर आकाच्या आकालाही जेलवारी होणार’, सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
Suresh Dhas : बीड येथील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शनिवारी परभणीत मोर्चा काढण्यात आला. या सर्वपक्षीय मोर्चात भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. आकाच्या आकालाही जेलवारी निश्चित आहे, आकाचे आका करलो जल्दी तयारी, अब निकली है जेलवारी, असं म्हणत धस यांनी मुंडेंवर निशाणा साधला.
पंकजा मुंडेंनी गद्दारी केली? सुरेश धस थेट बोलले…
कोम्बिंग ऑपरेशनची चौकशी करा – धस
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींच्या कठोर शिक्षेच्या मागणीकरिता परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार राजेश विटेकर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आदी नेते उपस्थित होते. या मोर्चाला संबोधित करतांना धस म्हणाले की, जगात जर्मनी अन् देशात परभणी असं देशात नाव आहे. मी 18 महिने या परभणीचा पालकमंत्री होता. परभणीत किती रगेल आहे, हे मला माहित आहे. या परभणीत सोमनाथ सूर्यवंशी हा वकीलीचे शिक्षण घेणारा मुलगा पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्या कोम्बिंग ऑपरेशनची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
बहिणीने माझी लाज वेशीवर टांगली… छोटा पुढारी निक्कीवर का चिडला?
यावेळी मस्साजोग प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावायला हवा, अशी मागणीही धस यांनी केली.
आका (वाल्मिक कराड) जेलमध्ये गेलाय. आता आकाच्या आकांचा (धनंजय मुंडे) यांचाही नंबर लागू शकतो. कारण यांची प्रकरणं थेट माणसं मारण्यापर्यंत येऊन ठेपली आहेत. आमच्या लेकराने तुमचं काय बिघडवलं होतं? एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला आमचा संतोष गेला होता. जर आकाने त्याच्या आकाला मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल… तर त्यांनाही जेलची तयारी करावी, आका जल्दी करलो तयारी, निकलेंगी तेरी जेलवारी असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवरही टीका केली.
धस यांनीही अजित पवार यांच्यावरही टीका केली. धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश का करण्यात आला? असा सवाल धस यांनी उपस्थित केला. अजितदादांना म्हटलं, पाच टर्म आमदार असणाऱ्या प्रकाश सोळंकेंना मंत्री करा, राजेश विटेकर यांना मंत्री का आणि दोन्हीही नाही जमले तर बुलडाण्यातून निवडून आलेल्या कायंदेंना मंत्री करा. हवं तर आमचा जिल्हा पालकमंत्रीपदाविना ठेवा. काही फरक पडत नाही. पण आकाच्या आकाला (धनंजय मुंडे) यांना मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, क्या हुआ तेरा वादा, अशा शब्दात धस यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.
बीडला बारामतीची माणसं पाठवा…
आतापर्यंतच्या हत्येची बेरीज करा, त्या कोणी घडवून आणल्या. त्याच्या मागचा मास्टरमाईंड कोण? हे जर तुम्हाला माहिती नसेल तर परभणीला आणि बीडला बारातमीची माणसं पाठवा, असं आव्हान धस यांनी केली.