Download App

वाल्मिक कराडकडे 17 मोबाईल अन् 100 बॅंक खात्यांत 1000 कोटी रुपये; धसांचा खळबळजनक दावा

वाल्मिक कराडचे 100 अकाऊंट सापडले आहेत. मी पाच टर्म आमदार आहे, माझं एकच अकाऊंट आहेत. - सुरेश धस

  • Written By: Last Updated:

Suresh Dhas On Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे पहिल्या दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड ( Walmik Karad ) यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडजस अन्य आरोपींना अटक करण्यात आली. मात्र अटक होऊनही वाल्मिक कराडचे नवे कारनामे समोर येत आहेत. आमदार धस हे कराडचे कारनामे पुढे आणत आहेत.

धनंजय मुंडे जातीयवादी, लोकांना मारण्यासाठी टोळ्या पाळतात, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप  

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, वाल्मिक कराडचे 100 अकाऊंट सापडले आहेत. मी पाच टर्म आमदार आहे, माझं एकच अकाऊंट आहेत. अदानी, अंबानी आणि रतन टाटा सुध्दा वापरतील नसतील एवढे मोबाईल ते वापरत आहेत. मी अंबानींना विचारणार आहे की तुम्ही किती मोबाईल वापरता? किंवा नीता ताईंना जाऊन विचारतो. कारण आमचे वाल्मिक अण्णा 17 मोबाईल वापरतात. त्यांची 100 बँक खाती सापडली आहेत. त्या खात्यात आणखी 1000 कोटी रुपये असतील, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला.

शेतकऱ्यांना दिलासा, कुकडी आणि घोड प्रकल्पातून चार आवर्तन देण्याचा निर्णय 

आरोपीच्या वकिलाने केज कोर्टात विष्णू चाटे हाच आका असल्याचा आरोप केला. त्यावरही धस यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, विष्णू चाटे हा एक प्यादं आहे. आका म्हणजे वाल्मिक कराड आणि आक्काचे आका म्हणजे वाल्मीक कराडचे आका धनंजय मुंडे असल्याचा दावा धस यांनी केला आहे.

दरम्यान, आज याप्रकरणी सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. उद्या चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेणार असल्याचे धस म्हणाले.

मुंडेंकडून चौकशी प्रभावीत- आव्हाड
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय, पण त्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांनी राजकारण बंद करावं आणि योग्य कारवाई करावी. या हत्या प्रकरणात सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीमधून पीएसआय महेश विघ्ने याची उचलबांगडली केली. तो चौकशी प्रभावित करेल असं असं तुम्हाला वाटतं. मग मुंडे सत्तेत राहिले तर ते चौकशी प्रभावित करणार नाहीत का? असा सवाल आव्हाड यांनी केला.

follow us