भाजपने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा वापर करून घेतला. परंतु ते गेल्यावर त्यांच्या शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. मेटेंनी बीड जिल्ह्याला मोठे योगदान दिले तसेच त्याच्या शिवसंग्रामने मराठा आरक्षण आंदोलनाला नवी दिशा दिली.
भाजपने महादेव जानकर यांचा देखील वापर करून घेतला. आणि गरज संपल्या नंतर त्यांना देखील बाजूला केले. तसेच भाजपने सदाभाऊ खोत यांचा देखील वापर करून घेतला. भाजप असेच सर्वांचा वापर करून घेते आणि सोडून देते. आता असेच मिंदे गटाचे चाळीस गद्दार देखील त्यांच्या सोबत आहे त्यांचा देखील भाजप वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे. असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला त्या आज आज बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेचा सांगता सभेत बोलत होत्या.
मुंडे साहेब होते तेव्हा भाजप शिवसेना युती होती, परंतु आज मुंडे साहेब नसल्याने भाजपमध्ये शब्द न पाळणारे बेमान लोक आहेत. ते राजकारण करण्याऐवजी कळसूत्री बाहुल्या खेळण्याचा खेळ करतात. असाच खेळ भाजप आता आमच्यातील गद्दारांचा करणार आहे.
आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू परळी ठरणार; संजय राऊतांना विश्नास
यावेळी सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना त्यांच्या वायद्यांची आठवण करून दिली. भाजप कायम जाती – धर्माचे राजकारण करत आले असे यावेळी अंधारे म्हणाल्या. तसेच भाजप महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा यामध्ये सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे ते आता जाती – धर्माचे राजकारण करत आहे.
महागाईवरून सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ दाखून त्यांच्यावर टीका केली. 2014 साली 400 रुपयाला मिळणार गॅस आज 1200 रुपयाला मिळतोय 50 रुपयाचे पेट्रोल शंभरी पार गेले. तरी गे भाजपावाले म्हणता देशात महागाई नसल्याचे म्हणतात. एकेकाळी महागाई बदल बोलणाऱ्या या लोकांनी आता महागाईचा डोंगर उभा केलाय. आणि महागाई बाबत बोलले की यांना झोमत आता का महागाईबाबत मोदी बोलत नाहीत. असा सवाल यावेळी अंधारेंनी उपस्थित केला.