आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू परळी ठरणार; संजय राऊतांना विश्नास

आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू परळी ठरणार; संजय राऊतांना विश्नास

Sanjay Raut : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)राज्यात (Maharashtra)एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष (Victory cheers)साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ (Parli Vaidyanath) हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी परळीमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. संजय राऊत सध्या बीड (Beed)दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

अश्विनी महांगडे दिसणार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या भूमिकेत

खासदार संजय राऊत यांचे स्वागत करताना राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या हाताने त्यांना मानाचा फेटा बांधला. धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांचे फेटा बांधण्याचे कौशल्य पाहून, संजय राऊत यांच्यासह सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केल्याचे दिसून आले. धनंजय मुंडे यांनी बांधलेला हा फेटा महाविकास आघाडीला राज्यात सत्तेकडे घेऊन जाणारा ठरेल, असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी या फेट्याबद्दल खासदार राऊत म्हणाले की, हा फेटा इथे धनंजय मुंडे यांच्याकडून बांधून घेतला आहे, आता राज्यात सर्वत्र विजयाचे फेटे बांधत फिरायचे दिवस येणार आहेत, असंही खासदार राऊत म्हणाले.

यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनीही माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. येणारा काळ हा महाविकास आघाडीचा असेल व त्यासाठी आम्ही सर्व घटक पक्षातील सहकारी प्रयत्न करत आहोत.

बीड शहरात होत असलेल्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त (Mahaprabodhan Yatra) दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)तसेच अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत आज परळीत दाखल झाले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) पदाधिकाऱ्यांसह खासदार संजय राऊत यांचे जोरदार स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी एकत्रित जाऊन 12 ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlinga)एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शनही घेतले.

वैद्यनाथ मंदिरातून बाहेर पडताना खासदार संजय राऊत, आमदार धनंजय मुंडे तसेच सुषमा अंधारे यांनी एकत्रितपणे माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान धनंजय मुंडे यांचे परळी मतदारसंघात स्थानिक शिवसेना नेत्यांशी नेहमीच जवळकीचे संबंध राहिले आहेत. व्यक्तिगत माझ्या बाबतीत तर कायम ते मोठ्या भावाच्या भूमिकेत राहून सदैव माझ्या पाठिशी उभे असतात, असे मत सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते वाल्मिक कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, अभयकुमार ठक्कर, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, माणिक फड, बाळासाहेब अंबुरे, राजेंद्र सोनी, राजेश देशमुख यांसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube