Download App

निलंबित पोलिस अधिकाऱ्यासाठी सावंतांची थेट पोलिस अधीक्षकांना दमदाटी; व्हिडीओ व्हायरल

  • Written By: Last Updated:

Tanaji Sawant : आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यात आता त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी एका निलंबित पोलिस अधिकाऱ्यासाठी थेट पोलिस अधीक्षकांनाच दमदाटी केल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल देखील अवमानकारक वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे.

भारतीयांनी मुहूर्त साधला! धनत्रयोदशीला 42 टन सोन्याची खरेदी; 30 हजार कोटींची उलाढाल

झालं असं की, धाराशिव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या जागेवर येऊ इच्छित असलेले एक निलंबित पोलिस निरीक्षक मोरे यांनी थेट आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सावंत यांनी मोरे यांनी संबंधित पदावर घेण्यासाठी थेट पोलिस अधीक्षकांना दमदाटी केल्याचं बोललं जात आहे.

Uddhav Thackeray : ‘आता ठाणेकरच गद्दारांना धडा शिकवतील’; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

मोरे यांना तत्काकालीन गृहमंत्री असलेल्या दिलीप वळसे पाटलांनी निलंबित केलं होतं. त्यांनी आंबेजोगाई येथे अवैध धंद्यांना अभय देणे, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात कुचकामी ठरल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्याबाबतचा तानाजी सावंतांचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान सावंतांचा हा व्हायरल व्हिडीओ या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

follow us