Download App

आम्ही कधीच बदलत नाही; ‘बापाचं नाव बदलण्याची वेळ’ म्हणणाऱ्या जलील यांना फटकारलं

Khultabad Change Name : औरंगजेबाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. आता औरंगजेबानंतर खुलताबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आलायं. मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी खुलताबादच्या नामांतराबाबत मागणी केलीयं. त्यावर बोलताना एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली. या टीकेवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पलटवार केलायं.

जातनिहाय जनगणनेला मोदी, संघाचा विरोध; PM मोदींच्या होमपीचवरुन राहुल गांधींची तोफ

माझ्या बापाचं नाव भाऊसाहेब खैरे आहे, ते आहेच, आम्ही कधीच बदलत नाहीत. जलील जे काही म्हणतात, त्यांच्या म्हणण्याला आम्ही कधीच महत्व देत नाही, असा पलटवार चंद्रकांत खैरे यांनी जलील यांच्यावर केलायं.

Pune News : आईने जुळ्या मुलांना टाकीत बुडवून मारलं, नंतर आत्महत्येचा प्रयत्न…

तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळात या शहराचे नाव संभाजीनगर ठेवले होते. त्यावेळी आम्ही रत्नपूरची आठवण करून दिली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे खुलताबादचं रत्नपूर करायचं असं म्हणाले होते. खुलताबाद हे नाव कशाला पाहिजे. खुलताबादचे नाव रत्नपूर झाले पाहिजे. तेव्हापासूनच आम्ही खुलताबादला रत्नपूर असे म्हणतो, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

काय म्हणाले होते इम्तियाज जलील?
औरंगजेबाच्या मुद्द्यानंतर खुलताबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आला. या मुद्द्यावर बोलताना जलील मह्णाले, भाजपने रस्त्यांसह शहरांची नावे बदली आहेत. सर्व नावे बदलून झालीयं, आता त्यांना त्यांच्या बापाचं नाव बदलण्याची वेळ आली असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केली.

follow us