देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून सरकारी वकील उज्वल निकम यांना हटवण्याची मागणी, काय आहे कारण?

देशमुख हत्या प्रकरणाचा खटला लढवणारे उज्वल निकम यांना बदलण्यात यावं अशी मागणी आज न्यायालयात आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली आहे.

News Photo   2025 12 19T184216.724

देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून सरकारी वकील उज्वल निकम यांना हटवण्याची मागणी, काय आहे कारण?

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची वर्षभरापासून कोर्टात सुनावणी सुरु आहे. (Beed) आज या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींविरोधातको कोर्टात आरोप निश्चितीची सुनावणी सुरु झाली. दरम्यान, या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं, अशी मागणी आरोपींकडून न्यायालयात करण्यात आली आहे.

सरकारी वकील म्हणून देशमुख हत्या प्रकरणाचा खटला लढवणारे उज्वल निकम यांना बदलण्यात यावं अशी मागणी आज न्यायालयात आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. उज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे याचा या केसवर परिणाम होत आहे असं कारण देत थेट आरोपीच्या वकिलांकडून न्यायालयात आज अर्ज करण्यात आला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी; आरोपी घुले चक्कर येऊन पडला, काय घडलं?

आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद मांडला, तर विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित होते. आरोपींच्या वतीने वकील विकास खाडे, अनंत तिडके, राहुल मुंडे आदी न्यायालयात हजर होते. आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर सादर झाले.

आजची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या प्रकरणाची ही पहिलीच सुनावणी ठरली. या सुनावणीत प्रकरणावर आरोप निश्चिती (चार्ज फ्रेम) होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यानंतर प्रत्यक्ष साक्षी-पुराव्यांची सुनावणी सुरू होणार आहे.

Exit mobile version