MIM नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर ‘बुलडोझर’ निदा खानला मदत करणं भोवलं

महापालिकेने पटेल याची दोन घरे आणि कार्यालय अवैध असल्याने त्याबाबतची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.

News Photo   2026 05 13T160116.509

MIM नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर 'बुलडोझर' निदा खानला मदत करणं भोवलं

नाशिकच्या ‘टीसीएस’ प्रकरणातील आरोपी निदा खान (Needa Khan) हिला मदत केल्याच्या अरोपानंतर एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अवैध घरावर महापालिकेने बुधवारी ‘बुलडोझर कारवाई केली. सकाळी सहा वाजता त्याचे घर जेसीबी लावून पाडण्यात आले. सकाळी सहा वाजता महापालिकेने पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई केली. त्याचे कार्यालय आणि दोन निवासस्थांना महापालिकेने नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्यासाठी ७२ तासाचा वेळ दिला होता.

या नोटिसीच्या विरोधात नगरसेवक पटेल याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली नाही, असे सांगत महापालिकेने ही कारवाई केली. यात नारेगावमधीगल ज्या घरात निदा खान हिला लपविण्यात आले होते ते घर मतीन पटेल याच्या नावावर नव्हते. मतीन पटेल या एमआयएमच्या नगरसेवकाने धर्मांतरास प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या निदा खान हिस मदत केली होती. नारेगावमधील एका घरात निदा खान, तिची मावशी व बहीण यांना ठेवण्यात आले होते. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यास सहआरोपी केले आहे.

 

दरम्यान महापालिकेने पटेल याची दोन घरे आणि कार्यालय अवैध असल्याने त्याबाबतची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. मात्र, या अनुषंगाने उच्च न्यायालयात कारवाईस स्थगिती नसल्याचे सांगत महापालिकेने सकाळी घरावर बुलडोझर चालवला. आता घर जमीन दोस्त करण्यात आले आहे. दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या पथकाला हार घालून नाराजी व्यक्त केली. महापालिकेने मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर कारवाई करेल अशी कुणकुण लागल्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी रात्री पटेल यांची भेट घेतली.

मतीन पटेल यांच्यावर दोष सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे अशा काळात त्यांच्या पाठिशी आम्ही आहोत. अनाधिकृत बांधकामाची नोटीस ही बेकायदा असून १५ दिवसाची मुदत देण्याचे सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश असताना एमआयएम वर खापर फुटावे म्हणून सत्ताधारी हे सारे घडवून आणत आहेत. त्यामुळे कायदा हातात न घेता महापालिकेच्या पथकाचे फुलांचे हार घालून स्वागत केले जाईल असे जलील यांनी म्हटले होते. सकाळी पथक पोहचले तेव्हा त्यांच्या घरात फुलांचे घार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

केवळ मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालविण्यात घाई करण्यात आली. खरे शहरात अनेक नगरसवेकांची घरे, दुकाने अनाधिकृत आहेत. त्या सर्वांचे पुरावे आमच्याकडे आहेत. अशा नगरसेवकांची यादीच आहे. ती सर्व कागदपत्रे महापौर आणि महापालिका आयुक्तांना सादर करू, असे महापालिकेचे एमआयएमचे विरोधी पक्ष नेते साजिद बिल्डर यांनी म्हटले आहे. जी तत्परता मतीन पटेलच्या घरासाठी दाखवली ती अन्य नगरसेवकांच्या बाबतीमध्ये पाळली जाते का, हे आम्हाला पहायचे आहे, असे ते म्हणाले.

Exit mobile version