Download App

मराठवाड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; वाचा, हवामान विभागाने काय दिला अंदाज?

  • Written By: Last Updated:

Rain Update In Marathwada : आज सकाळपासून मराठवाड्यात आकाश ढगाळलेले असून, हवामान विभागाने मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या भागामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. (Marathwada) काही भागात पावसाचा अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी २४ तासांत मराठवाड्यासोबतच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी, महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना दोषी

पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे . या काळात वादळी पावसासह विजांचा हादका आणि अतिवृष्टीच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. IMD ने अचानक होणाऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे  मुंबईच्या शहरात लो-लाईंग भाग, नदीकाठीचे भाग आणि रहिवासी विभाग पाण्यात बुडण्याची शक्यता निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना आपल्या परिसराची सुरक्षा आणि संभाव्य धोक्यांना लक्ष देण्याची सूचना केली आहे.

या काळात रस्ता वाहतूक, रेल्वे सेवा आणि सार्वजनिक वाहने प्रभावित होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना प्रवास पूर्व नियोजन आणि तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे, ज्यामुळे अचानक आलेल्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागणार नाही. सध्या हवामान स्थिर असून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. उद्या मात्र येलो अलर्ट जारी केला असून काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सर्वांनी योग्य ते नियोजन करावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

follow us