मोठी बातमी, महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना दोषी

मोठी बातमी, महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना दोषी

Prajwal Revanna : महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना कर्नाटकच्या खासदार- आमदार न्यायालयाने दोषी ठरवले आहे. हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील फार्महाऊसमध्ये माजी खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांनी मोलकरणीवर बलात्कार केला होता. गेल्या 14 महिन्यांपासून रेवन्ना तुरुंगात आहेत.

या प्रकरणात न्यायालयाने सर्व 26 साक्षीदारांचे आणि रेवन्ना यांचे म्हणणे ऐकले. पुरावे आरोपीचा गुन्हा स्पष्टपणे सिद्ध करतात असा युक्तीवाद पीडितेच्या बाजूने करण्यात आला होता. तर प्रज्वल रेवन्ना यांच्याकडून जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला आहे.

प्रकरण काय ?

लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्वल रेवन्ना यांचे कथित अश्लील फोटो असलेला पेन ड्राइव्ह व्हायरल झाला होता. या प्रकरणात एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. या प्रकरणात पोलिसांनी माजी खासदार रेवन्ना यांना 31 मे 2024 रोजी अटक केली होती. रेवन्ना यांच्यावर हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील एका फार्महाऊसमध्ये 48 वर्षीय मोलकरणीवर दोनदा बलात्कार केल्याचा आरोप होता.

आता स्पोर्ट्स विभागात रमी स्पर्धा होणार…, अंबादास दानवेंचा कोकाटेंवर हल्लाबोल

रेवन्ना यांच्या पेन ड्राइव्हमध्ये सुमारे 2 हजार अश्लील व्हिडिओ असल्याचा आरोप आहे. रेवन्ना यांच्यावर प्रथम महिलांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. रेवन्ना यांच्याविरुद्ध पहिली तक्रार एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती. महिलेने आरोप केला होता की रेवन्ना 2021 पासून तिच्यावर बलात्कार करत होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube