आता स्पोर्ट्स विभागात रमी स्पर्धा होणार…, अंबादास दानवेंचा कोकाटेंवर हल्लाबोल 

आता स्पोर्ट्स विभागात रमी स्पर्धा होणार…, अंबादास दानवेंचा कोकाटेंवर हल्लाबोल 

Ambadas Danve On Manikrao Kokate : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) नेते आणि राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चर्चेत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात त्यांचा ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. विरोधक चारही बाजूने टीका करत असल्याने सरकारने माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातेचा पदभार काढून घेत त्यांना आता क्रीडा खातेचा पदभार दिला आहे. सरकारने माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता स्पोर्ट्स विभागात रम्मीच्या स्पर्धा सुरु होतील अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, आता स्पोर्ट्स विभागात रम्मीच्या स्पर्धा सुरु होतील. उन्हाळा आणि पावसाळ्यात या स्पर्धा सुरु राहणार आहे. बेशरमपणाची हद्द आहे. फक्त खाते बदलणे ही कारवाई नाही. सर्व खाते समान असतात. आता सरकार रमी खेळण्यासाठी अधिकृतपणे दर्जा देणार असं वाटतेय अशी टीका माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी केली. तसेच कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आपण लवकरच राष्ट्रपतींना भेटणार असल्याची माहिती देखील यावेळी दानवे यांनी दिली.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, सरकारकडे बहुमत आहे पण कारवाई करण्याची ताकद आणि दम नाही. हमाम मे सब नंगे अशी सध्या परिस्थिती झाली आहे. मुख्यमंत्री बोलले आहे की कारवाई करणार पण शब्दांच्या बुडबुड्यांना काय अर्थ आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करुन दाखवावी असं माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले.

भाजपला 10 पैकी 9 जण शिव्या देतात

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मंताची चोरी झाली असल्याचा आरोप करत आहे. यावर देखील अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज जनतेत भाजपला 10 पैकी 9 जण शिव्या देत आहे त्यामुळे भाजपला मते कसे पडतात हा प्रश्न निर्माण होत आहे. आम्हाला देखील हा प्रश्न पडत आहे. त्यामुळेच राहुल गांधी मत चोरीचा आरोप करत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी दिली.

‘मला कृषी खात्यासाठी आग्रह होता, पण…’; छगन भुजबळांनीच फोडला राजकीय बॉम्ब

follow us
  • fb
  • instagram
  • youtube